- ऋजुता लुकतुके
इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेत १-१ अशा बरोबरीनंतर आता तिसरी कसोटी सुरू होणार आहे. ही कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लिश संघाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पाक आणि इंग्लिश खेळाडूंमधील फरक म्हणून या व्हिडिओकडे पाहिलं जात आहे. इंग्लिश खेळाडू समुह फोटोनंतर आपापल्या खुर्च्या उचलून नेताना या व्हिडिओत दिसत आहेत.
पहिल्या दोन कसोटी मुलतानमध्ये पार पडल्या होत्या. आणि तिसरी रावळपिंडी इथं आहे. त्यापूर्वी संघाचा एक एकत्र फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता. फोटो काढल्यावर इंग्लिश खेळाडूंनी स्वाभाविकपणे आपापल्या खुर्च्या उचलल्या. मैदान सरावासाठी मोकळं केलं.
England Team Discipline ✓#PakistanCricket #PAKvENG pic.twitter.com/H7jTKYY3y2
— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) October 23, 2024
(हेही वाचा – Lionel Messi : लायनेल मेस्सीची कमाई अमेरिकेतील २२ क्लबच्या मिळून कमाईपेक्षा जास्त!)
पहिल्या कसोटीत इंग्लंडने ७ बाद ८३३ अशी धावसंख्या रचली होती. तिच्या जोरावर पाकिस्तानवर विजय मिळवला. हॅरी ब्रूकने या सामन्यात त्रिशतक झळकावलं. कर जो रुटने द्विशतक केलं. त्यानंतर पाकचा चौथा डाव झटपट गुंडाळून इंग्लंडने मोठा विजय मिळवला. तर दुसरी कसोटी पाकने १५२ धावांनी जिंकली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर नोमन अली, अबरार अहमद आणि झहीद मेहमूद या तिघांनी पाकला विजय मिळवून दिला.
रावळपिंडीची खेळपट्टी ही तेज गोलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे इथंही थरारक क्रिकेट पहायला मिळेल अशी आशा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community