-
ऋजुता लुकतुके
इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये धक्कादायक निकालांचा सिलसिला सुरूच आहे. गतविजेते मँचेस्टर युनायटेड लिग कपमधून बाद झाले आहेत. (English Premier League)
मँचेस्टर युनायटेडचं लीग चषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूकॅसल संघाने त्यांना त्यांच्याच घरच्या मैदानात ०-३ असं हरवलं. वेस्ट हॅम संघानेही आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद करताना आर्सेनलला ३-१ असं हरवलं. लिव्हरपूल संघाने मात्र बोर्नमाऊथ संघाचा २-१ असा निसटता पराभव करत स्पर्धेत आगेकूच सुरू ठेवली आहे. तर आणखी एक तगडा संघ चेल्सीनेही ब्लॅकबर्नला २-० असं हरवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. (English Premier League)
या सगळयांत लक्षात राहिला तो मँचेस्टर युनायडेटला न्यूकॅसल संघाने दिलेला दणका. न्यूकॅसलची बचाव आणि आक्रमणातील खोली या सामन्यात नजरेत भरणारी होती. दुसरीकडे मँचेस्टर युनायटेड संघाची हंगामातील सुरुवात खराब झाली आहे आणि विविध स्पर्धांमध्ये मिळून १५ पैकी ८ सामने त्यांनी आतापर्यंत गमावले आहेत. (English Premier League)
(हेही वाचा – My Lord in Supreme Court : जेव्हा न्यायमूर्ती वकिलांना स्वत:चा अर्धा पगार देऊ करतात…)
न्यूकॅसलने या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी अशा दोन तगड्या संघांचं आव्हान संपुष्टात आणलं. मॅनयु बरोबरच्या सामन्यात बदली खेळाडू लिव्हरामेंटो आणि लुईल हॉल यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं. २८ व्या मिनिटाला त्यांचा पहिला गोल झाला तोच लिव्हरामेंटोच्या चपळ हालचालींमुळे. (English Premier League)
त्यानंतर आणखी आठच मिनिटांनी हॉलने संघाचा दुसरा गोल केला. लुईस हॉलला या हंगामात न्यूकॅसल संघाला चेल्सीकडून कर्जाऊ घेतलं आहे. पण, तो संघासाठी चांगली भूमिका बजावत आहे. या सुरुवातीच्या गोलनंतर जो विलिकने तिसरा गोल आपल्या एकट्याच्या जबाबदारीवर केला. ३-० अशा आघाडीनंतर मॅनयुला बरोबरीची संधी फारशी नव्हतीच. त्यामुळे त्यांचा पराभव तिथेच स्पष्ट झाला. न्यूकॅसल बरोबरच लिव्हरपूल आणि चेल्सी या संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. (English Premier League)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community