- ऋजुता लुकतुके
स्पेनने इंग्लंडचा २-१ ने पराभव करत युरो चषक विक्रमी चौथ्यांदा जिंकला आहे. ८७ व्या मिनिटाला मिकेल ओयेरझबलने (Mikel Oyarzabal) केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. यापूर्वी स्पेनने १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. सामन्याचा ८५ व्या मिनिटानंतरचा खेळ चांगलाच रंगतदार ठरला. स्पेनचं आक्रमण सुरूच होतं. ८७ व्या मिनिटाला मार्क कुकुरेलाचा (Marc Cucurella) एक क्रॉस फटका मिकेलने अचूक पकडला. हा गोल केला. (Euro Cup 2024)
🏆🏆🏆🏆 #C4MPEONES pic.twitter.com/A6vNi3ZCZT
— Selección Española Masculina de Fútbol (@SEFutbol) July 14, 2024
एक्स्ट्रा टाईमच्या थोडंच आधी स्पेननं हा निर्णायक हल्ला केल्यामुळे इंग्लिश संघ चांगलाच गांगरला. पण, त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. लेमिन यामलने या सामन्यात गोल केला नाही. पण, पहिल्या गोलमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने रचलेल्या चालीवर ४७ व्या मिनिटाला विल्यम्सने गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली. आणि पहिल्या हाफमध्ये स्पेनच १-० असा आघाडीवर होता. पण, इंग्लंडनेही बरोबरीचे निकराचे प्रयत्न केले. आणि शेवटी ७३ व्या मिनिटाला कोल पाल्मरने बरोबरी साधून दिली. (Euro Cup 2024)
(हेही वाचा- पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट; व्हिडिओ व्हायरल होताच Central Railway ला जाग)
इंग्लिश संघाला या पराभवामुळे पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या संघाने १९६६ च्या फिफा विश्वचषक विजयानंतर एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. सलग दोन युरो चषक अंतिम फेरीत त्यांचा पराभव झाला आहे. बर्लिनच्या ऑलिम्पिक स्टेडिअमवर (Berlin Olympic Stadium) झालेल्या या सामन्यात प्रिन्स विल्यम्स (Prince Williams) आणि स्पेनचा राजा किंग फिलीप (King Philip) उपस्थित होते. (Euro Cup 2024)
😌 Insisto ¡¡SOMOS #C4MPEONES!!#VamosEspaña | #EURO2024 pic.twitter.com/MWbOaKWEs4
— Selección Española Masculina de Fútbol (@SEFutbol) July 14, 2024
या विजयानंतर स्पेनच्या पाठिराख्यांमध्येही उत्साह संचारला. यामल, दानी आणि कुकुरेला यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन आनंद साजरा केला. दानी हा सगळ्यात ज्येष्ठ स्पॅनिश खेळाडू आहे. त्याने विजेतेपदानंतर चेहरा झाकत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. संघ सहकारीही त्याच्या भोवती जमत त्याला सावरताना दिसले. (Euro Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community