World Cup 2023 : प्रत्येकाने विराट कोहलीसाठी हा विश्वचषक जिंकायलाच हवा – वीरेंद्र सेहवाग

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार अनुभवता येणार आहे.

230
World Cup 2023 : प्रत्येकाने विराट कोहलीसाठी हा विश्वचषक जिंकालाच हवा - वीरेंद्र सेहवाग

गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेटप्रेमींना विश्वचषकाच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. विशेष म्हणजे या वर्ल्ड कपमधील भारत पाकिस्तान सामना नक्की कुठे खेळला जाणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते. आज म्हणजेच मंगळवार २७ जून रोजी अखेर आयसीसी कडून वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आयसीसीने एक पत्रकार परिषद घेऊन हे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार अनुभवता येणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात जन्म झालेल्या ‘मल्लखांब’चा शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश नाही; खेळाडूंचे भविष्य अधांतरी)

या वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता. यावेळी विरेंद्र सेहवाग याने विश्वचषकाचे चार दावेदार संघ कोणते असू शकतात, याबाबत सांगितले. त्याशिवाय विराट कोहली आणि धोनीबद्दलही भाष्य केले. विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा, असे वक्तव्य वीरेंद्र सेहवाग याने केले आहे.

विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा

भारतीय संघातील प्रत्येकाने विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा. विराट कोहली हा ग्रेट खेळाडू तर आहेच. त्याशिवाय तो चांगला माणूसही आहे. तो नेहमीच इतर खेळांडूना मदत करण्यासाठी पुढे येतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये खूप समानता आहे. मोठ्या स्पर्धेत अथवा सामन्यात विराट कोहली इतरांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो, असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.

‘हे’ असतील विश्वचषकातील मुख्य चार दावेदार संघ

यावर्षीच्या विश्वचषकातील प्रमुख चार संघांविषयी सेहवाग याला विचारलं असतांना वीरेंद्र सेहवाग याने भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांची निवड केली आहे. सेहवागच्या मते हे चार संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत जाऊन यातीलच एक संघ विजयी होईल.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.