-
ऋजुता लुकतुके
सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा मोहम्मद शामीने आपल्या यशाबद्दल संयत प्रतिक्रिया देताना गोलंदाजी म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे असं म्हटलंय. (Mohammed Shami on Success)
गोलंदाजीतील भारताचा नवा स्टार महम्मद शामीने आपल्या अलीकडच्या यशावर अगदी संयत प्रतिक्रिया दिलीय. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाने श्रीलंकन संघाचा ३०२ धावांनी धुव्वा उडवला आणि यात शामीची १८ धावांत ५ बळी ही कामगिरी उठून दिसली. पण, या कामगिरीनंतर तो शांतच होता. (Mohammed Shami on Success)
पुरस्कार वितरण सोहळ्यात सामनावीराची ट्रॉफी घेताना तो इतकंच म्हणाला, ‘हे काही रॉकेट सायन्स नाही.’ स्पर्धेत तीन सामन्यांत १४ बळी कसे मिळवले सांगताना तो पुढे म्हणतो, ‘चांगली लय, चांगलं जेवण, मनात फक्त गोलंदाजीचा एकमार्गी विचार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं प्रेम, असं सगळं जुळून आलं की चांगली कामगिरी होते.’ (Mohammed Shami on Success)
शामी आता विश्वचषक स्पर्धेतील भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. जवागल श्रीनाथ आणि झहीर खानला मागे टाकत त्याने ४५ विश्वचषक बळी टिपले आहेत. (Mohammed Shami on Success)
An iconic picture.
– Shami, the leading wicket taker for India in 48 year old World Cup history 🔥 pic.twitter.com/F2CNZPyXXJ
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
(हेही वाचा – Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या ‘या’ मागणीवर ८ नोव्हेंबरला सुनावणी)
लोकांचा पाठिंबा खूप मोलाचा आहे, असं शामी मानतो. ‘भारतात तर लोकांचा जयघोष सुरूच असतो. पण, बाहेर जातो तेव्हाही तिथले भारतीय आमचं स्वागत करतात. आम्हाला प्रेम देतात. त्यांना बघून प्रेरणा मिळते आणि लोकांना खुश करणारी कामगिरी हातून घडावी, असं वाटत राहतं,’ असं शामी शेवटी म्हणाला. (Mohammed Shami on Success)
शामीला या विश्वचषकात तीन सामने खेळण्याचीच संधी मिळाली आणि यात त्याने न्यूझीलंड विरुद्ध ५४ धावांत ५, इंग्लंड विरुद्ध २२ धावांत ४ आणि आता श्रीलंकेविरुद्ध १८ धावांत ५ बळी मिळवले आहेत. सगळ्याच गोलंदाजांनी घेतलेली मेहनत आणि कामगिरीचा आनंद लुटण्याची संघातील मानसिकता यामुळे संघाच्याच कामगिरीत सकारात्मक बदल झाल्याचं शामीला वाटतं. (Mohammed Shami on Success)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community