Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित

यंदाचा विश्वचषक भारतीय खेळपट्ट्यांवर होत असल्यामुळे वेगवान गोलंदाजीची जादू म्हणावी तशी पाहायला मिळालेली नाही. पण, पाकिस्तानच्या हॅरिस रौफच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कामगिरीनंतर वेगवान चेंडूची चर्चा नक्कीच होऊ लागली आहे

161
Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित
Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित
  • ऋजुता लुकतुके

यंदाचा विश्वचषक भारतीय खेळपट्ट्यांवर होत असल्यामुळे वेगवान गोलंदाजीची जादू म्हणावी तशी पाहायला मिळालेली नाही. पण, पाकिस्तानच्या हॅरिस रौफच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कामगिरीनंतर वेगवान चेंडूची चर्चा नक्कीच होऊ लागली आहे. (Fastest Ball in Cricket History)

पूर्णपणे भारतात होणाऱ्या विश्वचषकात फिरकीचीच जादू जास्त चालणार हे उघड आहे. त्यामुळे इथंही चर्चा आहे ती कुलदीप यादवने आपल्या फसव्या वेगवान चेंडूने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या घेतलेल्या बळीची. इथं कुलदीपने वेगाने झपकन फिरकी घेणाऱ्या चेंडूवर बाबरला चकवलं होतं. (Fastest Ball in Cricket History)

पण, एरवी जलदगती असलेले गोलंदाजही भारतातला उकाडा आणि संथ खेळपट्टी यामुळे सातत्याने ताशी १५९ किमीच्या वरही जाऊ शकलेले नाहीत. आतापर्यंत फक्त ३ चेंडू हे १५० किमीपेक्षा जास्त वेगाने पडले. ते होते इंग्लिश गोलंदाज मार्क वूड, न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन आणि पाकिस्तानच्या हारिस रौफचे. (Fastest Ball in Cricket History)

यापैकी रौफच्या चेंडूनंतर जलदगती चेंडूची चर्चा नक्कीच सुरू झाली आहे. क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम रौफचा आदर्श खेळाडू शोएब अख्तरच्याच नावावर आहे आणि त्यानेच आता रौफला जितक्या वेगाने गोलंदाजी करता येईल, तितकी करण्याचा सल्ला दिला आहे. (Fastest Ball in Cricket History)

शोएबचा वेगवान चेंडू नेमका किती वेगवान होता आणि सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीत असलेला एकमेव भारतीय कोण हे जाणून घेऊया… (Fastest Ball in Cricket History)

हे चेंडू पाहताना फक्त वेग हाच निकष धरला आहे. चेंडू एकदिवसीय क्रिकेटमधील आहे की कसोटी किंवा टी-२० हे पाहिलेलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान चेंडूची शक्यता जास्त असते. (Fastest Ball in Cricket History)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडूचा मान पाकिस्तानच्या शोएब अख्तरकडे जातो. त्याने सातत्याने ताशी १६१ किमीच्या वेगाने गोलंदाजी केली आहे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिथल्याच वातावरणात खेळताना तर त्याची गोलंदाजी चांगलीच बहरली होती. (Fastest Ball in Cricket History)

विशेष म्हणजे शोएब खेळत असतानाच त्याला ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली आणि न्यूझीलंडचा शॉन टेट यांची तीव्र स्पर्धा होती. ऑस्ट्रेलियातील मालिकेत शोएब आणि ब्रेट ली यांच्यात नेहमीच स्पर्धा होती आणि वेगवान चेंडूचा विक्रम एकमेकांकडे फिरतही होता. पण, शेवटी शोएबनं २००३ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत १६१.३ किमी वेगाने चेंडू टाकला आणि आजही हा विक्रम कायम आहे. (Fastest Ball in Cricket History)

(हेही वाचा – Fire : सावंतवाडी येथे मांडवी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग)

आता पाहूया वेगवान चेंडूचा विक्रम नावावर असलेले पहिले दहा फलंदाज आणि यात कोण भारतीय आहे.

१. शोएब अख्तर – ताशी १६१.३ किमी

२. ब्रेट ली – ताशी १६१.१ किमी

३. शॉन टेट – ताशी १६१ किमी

४. जेफ थॉमसन – ताशी १६०.६ कमी

५. मिशेल स्टार्क – ताशी १६०.४ किमी

६. अँडी रॉबर्ट्स – ताशी १५९.७ किमी

७. फिडेल एडवर्ड्स – ताशी १५७.७ किमी

८. मिशेल जॉनसन – ताशी १५६.८ किमी

९. महम्मद शामी – ताशी १५६.४ किमी

१०. शेन बाँड – ताशी १५६.४ किमी

यापैकी मिशेल स्टार्क आणि मोहम्मद शामी या विश्वचषकातही खेळत आहेत. पण, भारतीय वातावरणात स्टार्कला १५० किमीचा टप्पाही यंदा गाठता आलेला नाही. (Fastest Ball in Cricket History)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.