- ऋजुता लुकतुके
इंडियन प्रिमिअर लीग ही क्रिकेटमधील एक मानाची लीग आहे. जागतिक दर्जाचं क्रिकेट इथं पाहायला मिळतं. कारण, जगातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये खेळतात. आतापर्यंत या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवही नसलेले गोलंदाज चांगली कामगिरी करून गेले आहेत. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या हंगामातील दीपक चहर जो अजून भारतासाठी खेळलेला नाही. पण, चेन्नई सुपरकिंग्ज या फ्रँचाईजीसाठी त्याने चांगली कामगिरी करताना ऑरेंज कॅपही पटकावली होती. (Fastest Balls in IPL)
(हेही वाचा – Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात?)
लीग भारतात होत असल्याने फिरकीपटूंचं वर्चस्व असलं तरी तेज गोलंदाजांनीही मैदान गाजवलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवान चेंडूंनी अनेकदा फलंदाजांना चकवलं आहे. पहिल्या हंगामात डेल स्टेनच्या स्टेनगनची चर्चा होती. तर त्यानंतर ब्रेट ली, शॉन टेट अशी तेज गोलंदाजांनी वेगवान चेंडूंचे विक्रम या स्पर्धेत केले आहेत. (Fastest Balls in IPL)
या लेखात आतापर्यंतच्या १६ हंगामातील सर्वात वेगवान चेंडू पाहूया. यासाठी ताशी वेग गृहित धरला आहे. (Fastest Balls in IPL)
२४ वर्षीय भारतीय गोलंदाज उमरान मलिक या यादीत मानाने झळकतोय. जम्मूच्या काश्मीरमधून आलेला हा क्रिकेटपटू सनरायजर्स हैद्राबादसाठी खेळतो. आणि तो देशातील सगळ्यात वेगवान गोलंदाज आहे. २०२२ मध्ये आयर्लंड विरुद्ध त्याने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. या संघात जसप्रीत बुमराच कर्णधार होता. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मलिकचा खेळ आणखी सुधारला आहे. (Fastest Balls in IPL)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community