-
ऋजुता लुकतुके
रणजी करंडकाच्या प्लेट गटाच्या साखळी सामन्यात हैद्राबादच्या तन्मय अगरवालने शुक्रवारी एका दिवसांत त्रिशतक ठोकण्याचा विक्रम केला. अरुणाचल प्रदेश विरुद्ध खेळताना त्याने १६० चेंडूंतच नाबाद ३२३ धावांची खेळी साकारली. यात त्याचं त्रिशतक १४७ चेंडूंत पूर्ण झालं. ही कामगिरी करताना तन्मयने वीरेंद्र सेहवागचा २८४ धावांचा विक्रमही मोडला.
जागतिक क्रिकेटमध्येही हा विक्रम असून २०१७ मध्ये मार्को मेराईसने १९१ धावांत त्रिशतक ठोकलं होतं. तो विक्रम आज मागे पडला.
Magnificent! 🤯
Hyderabad’s Tanmay Agarwal has hit the fastest triple century in First-Class cricket, off 147 balls, against Arunachal Pradesh in the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy match 👌
He’s unbeaten on 323*(160), with 33 fours & 21 sixes in his marathon knock so far 🙌 pic.twitter.com/KhfohK6Oc8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2024
तर भारताकडून वीरेंद्र सेहवागने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मुंबई कसोटीत एका दिवसांत २८४ धावा केल्या होत्या. तो विक्रमही आज मोडला. किंबहुना एका दिवसात त्रिशतक पूर्ण करणारा तन्मय हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती)
तन्मयने या मॅरेथॉन खेळीत तब्बल २३ षटकार आणि ३४ चौकार ठोकले. त्याच्या जोरावर हैद्राबाद संघाने अरुणाचल प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात एक बाद ५२९ धावा केल्या आहेत. तन्मयच्या जोडीने हैद्राबादचा कर्णधार राहुल सिंगने १०५ चेंडूंमध्ये १८५ धावांची खेळी साकारली. दोघांचा धडाका असा होता की, दुसऱ्या गड्यासाठी तन्मय आणि राहुल यांनी ४४९ धावांची भागिदारी रचली ती ४० षटकांतच.
या सामन्यात आणखी एक विक्रम झाला. तो म्हणजे सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांनी मिळून ७०१ धावा केल्या. हा ही आधुनिक क्रिकेटमधील एक विक्रम आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इसेक्स अशा प्रथमश्रेणी सामन्यात एकाच दिवशी ७२१ धावा झाल्या होत्या त्या १९४८ मध्ये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community