-
ऋजुता लुकतुके
फिफाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात २०२३ चा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू म्हणून अर्जेंटिनाच्या लायनेल मेस्सीची (Lionel Messi) निवड करण्यात आली. तर महिलांमध्ये हा मान ऐताना बोनमाटीला मिळाला. मेस्सीला हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला. पण, यंदा त्याच्यासमोर अर्लिंग हालांड, कायलन एमबापे यासारख्या खेळाडूंकडून मोठी चुरस होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही काही जणांनी नाराजी व्यक्त केली. पण, फिफाच्या गुणपद्धतीत मेस्सीच अव्वल ठरला.
Messi is crowned #TheBest! 👑🇦🇷
Click here for more information. ➡️ https://t.co/niVRuFY4lP pic.twitter.com/krIyrtkexL
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) January 15, 2024
सर्वोत्तम खेळाडूची नामांकनं जाहीर झाल्यानंतर फिफा मुख्य राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक, कर्णधार, पत्रकार आणि़ फुटबॉल चाहते यांच्याकडून मतं मागवते. यात पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मतं ज्या खेळाडूला मिळतात, त्याला पुरस्कार देण्यात येतो. यंदा मेस्सीला प्रथम क्रमांकाची, अर्लिंगला दुसऱ्या क्रमांकाची तर एमबापेला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.
(हेही वाचा – Deepak Kesarkar : महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज देणार शिष्यवृत्ती)
लंडनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पण, तीनही खेळाडू सोहळ्याला गैरहजर होते. थिओरी ऑन्रीने मेस्सीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
Aitana Bonmatí is #TheBest FIFA Women’s Player 2023! 🤩
Click here for more information. ➡️ https://t.co/lNztX2e3pn pic.twitter.com/UVr0zUBvEW
— FIFA Women’s World Cup (@FIFAWWC) January 15, 2024
महिला विभागात ऐताना बोनमाटीने यावर्षी निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. स्पेनला फिफा विश्वचषक मिळवून देण्याबरोबरच तिने बार्सिलोना या क्लबला चॅम्पियन्स करंडकही मिळवून दिला आहे. त्या जोरावर सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार तिने बहुमताने जिंकला.
बाकी पुरस्कारविजेत्या खेळाडूंमध्ये मँचेस्टर सिटीचंच वर्चस्व होतं. तर याच संघाचे प्रशिक्षक पेप गार्डियोला सर्वोत्तम प्रशिक्षक ठरले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community