FIFA Rankings : फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १२१ व्या क्रमांकावर घसरला

FIFA Rankings : भारतीय फुटबॉल संघाचं हे अलीकडच्या काळातील हे सगळ्यात खराब रँकिंग आहे. 

149
FIFA Rankings : फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १२१ व्या क्रमांकावर घसरला
  • ऋजुता लुकतुके

गेल्या महिन्यात विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला अफगाणिस्तान विरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. गुवाहाटीत झालेला हा सामना भारताने अनपेक्षितपणे गमावला होता. यामुळे फिफा विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने संघाला फटका बसलाच. शिवाय फिफा क्रमवारीतही भारतीय संघ (Indian team) चार स्थानांनी घसरला आहे. भारताची ताजी क्रमवारी आहे १२१. इगोर स्टायमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ गेल्यावर्षी क्रमवारीत शंभरच्या आत पोहोचला होता. (FIFA Rankings)

पण, एका वर्षात पुन्हा ही घसरण पाहायला मिळाली होती. विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारताने कुवेत विरुद्ध एक विजय मिळवला होता. आणि २० वर्षांत परदेशात मिळवलेला भारतीय संघाचा (Indian team) हा पहिला विजय होता. पण, त्यानंतर कतारमध्ये झालेल्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. उलट तीनही सामन्यांत संघाचा पराभव झाला. (FIFA Rankings)

(हेही वाचा – RBI: रेपो रेटचा थेट परिणाम बँक कर्जावर कसा होतो; जाणून घ्या…)

हे संघ पहिल्या दहांत

ऑस्ट्रेलिया (०-२), सिरिया (०-१) आणि उझबेकिस्तान (०-३) अशा सलग तीन पराभवांमुळे भारतीय संघ (Indian team) गटात तळाला राहिला. तर गेल्या महिन्यात अफगाणिस्तानने भारताला एकदा गोलशून्य बरोबरीत रोखलं. तर दुसऱ्या सामन्यात चक्क भारताचा पराभव झाला. (FIFA Rankings)

मार्च महिन्यातील फिफा क्रमवारीत भारतीय संघ ११७ व्या क्रमांकावर होता. तर डिसेंबर २०२३ मध्ये क्रमवारी १०२ होती. आता भारतीय संघ १२१ वर स्थिरावला आहे. भारताची सगळ्यात वाईट क्रमवारी १७३ होती. एकूण क्रमवारीत फिफा विश्वचषक विजेता अर्जेंटिनाचा संघ अव्वल आहे. तर फ्रान्स, इंग्लंड, बेल्जिअम आणि ब्राझील हे संघ त्या खालोखाल आहेत. नेदरलँड्स संघ सहाव्या तर पोर्तुगाल, स्पेन, इटली आणि क्रोएशिया हे पहिल्या दहांत आहेत. (FIFA Rankings)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.