लिओनेल मेस्सी या अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटूचे स्वप्न अखेर साकार झाले असून अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला आहे. २०२२ मध्ये वर्ल्डकप जिंकायचा असा निर्धारच अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी केला होता. याचा प्रत्यय अंतिम सामन्यात आला, अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरल्यावर पहिल्या ४५ मिनिटांतच त्यांनी दोन गोल केले.
फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगला. फ्रान्सने मोरक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. सांघिक खेळ कसा खेळावा याचे दर्शन अर्जेंटिनाच्या खेळामधून फुटबॉलप्रेमींना झाले. अर्जेंटिनाने संपूर्ण सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. अर्जेंटिनाच्या आक्रमणापुढे फ्रान्सच्या खेळाडूंची दमछाक झाली.
मेस्सीचे स्वप्न साकार
अर्जेंटिनाच्या विजयाने लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार झाले आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये अर्जेंटनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. २०१४ मध्ये वर्ल्डकप विजयाचे अर्जेंटिनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. यानंतर आता अर्जेंटिनाने ऐतिहासिक कामगिरी करत फ्रान्सचा पराभव केला आहे.
विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा झाला. ९० मिनिटे पूर्ण झाल्यावर दोन्ही संघांची धावसंख्या २-२ अशी होती. त्यामुळे अतिरिक्त वेळ देऊन सामन्याला पुन्हा एकदा सुरूवात झाली. दुसऱ्या हाफ मध्ये फ्रान्सने अर्जेंटिना विरुद्ध दोन गोल करत सामन्यात बरोबरी केली. अतिरिक्त वेळेत सुद्धा ३-३ अशी बरोबरी झाल्यामुळे पेनल्टी शूटआउटसाठी ५ संधी दोन्ही संघांना दिल्या गेल्या.
पेनल्टी शूटमध्ये फ्रान्सने ५ पैकी २ गोल केले अर्जेंटिनाने फ्रान्सचे २ गोल डिफेंड केले, तर अर्जेंटिनाने ४ गोल करत विश्वचषकावर नाव कोरले. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचचा थरार सुरू होता.
Join Our WhatsApp Community