FIFA 2022 : जपानने मॅचसोबत जिंकले संपूर्ण जगाचे मन! स्टेडियममध्ये दिला महत्त्वाचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल

सौजन्य - इन्स्टाग्राम

फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा यंदाचा संघ पाहता ते जपानविरुद्ध सहज विजय मिळवतील असे फुटबॉलप्रेमींना वाटत होते. परंतु विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर होत जपानने बलाढ्य जर्मनीवर विजय मिळवला. बुधवारी जर्मनी आणि जपानमध्ये हा फिफा वर्ल्डकपचा साखळी सामना झाला. जपानने सामना तर जिंकला पण स्टेडियमधील जपानी फॅन्सच्या कृतीने संपूर्ण जगाचे मन सुद्धा जपानने जिंकले आहे. खुद्द फिफाने सुद्धा जपानच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

जपानी संघासह फॅन्सचे जगभरात कौतुक 

जपानच्या टीमने जर्मनीला २-१ असे हरवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच दुसरीकडे सामना संपल्यावर जपानी फॅन्सनी ड्रेसिंग रुम आणि स्टेडियममध्ये साफसफाई केली.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले मोठे यश!)

जपानी खेळाडूंनी ड्रेसिंग रुम तर फॅन्सनी स्टेडियमधील कचरा साफ करत नवा आदर्श संपूर्ण जगासमोर निर्माण केला आहे. जपानच्या विजयानंतर प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. पण त्यानंतर हे जपानी प्रेक्षक स्टेडियममध्ये थांबले आणि त्यांनी संपूर्ण कचरा साफ केला. प्लास्टिक बॉटल, पिशव्या, झेंडेही उचलले. या कृतीची संपूर्ण जगभरात चर्चा होत असून फिफाने सुद्धा जपानी संघासह फॅन्सचे कौतुक केले आहे.

पहा व्हिडिओ

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiren Rijiju (@kiren.rijiju)

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here