अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अखेर साकार झाले. कतारच्या लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकात आपले नावे कोरले. त्याआधी हा सामना अधिकच्या वेळेत 3-3 आणि निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनाने विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरले आहे.
( हेही वाचा FIFA Final : अखेर ‘मेस्सी’चे स्वप्न झाले साकार! ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने कोरले फिफा विश्वचषकावर नाव; फ्रान्सचा पराभव )
कोणत्या संघांला किती प्राईज मनी?
- विजेता अर्जेंटिना- 347 कोटी रुपये
- उपविजेता संघ 248 कोटी रुपये (फ्रान्स)
- तिस-या क्रमांकावरील टीम- 223 कोटी रुपये ( क्रोएशिया)
- चौथ्या क्रमांकावरील टीम 206 कोटी रुपये ( मोरक्को)
केवळ नाॅटआट सामन्यात पोहोचणा-या संघांनाच नाही तर विश्यवचषक स्पर्धेत सहभागी होणा-या संघांनाही फिफाकडून काही रक्कम दिली जाते. कोणत्या संघांना किती रक्कम मिळाली, हे जाणून घेऊया.
प्रत्येक संघाला 9-9 मिलियन डाॅलर
- प्री – क्वार्टर फायनलमध्ये संघांसाठी 13 मिनियन डाॅलर्सची बक्षीस रक्कम
- क्वार्टर फायनमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी 17 मिलियन डाॅलर्स बक्षीस रक्कम