FIFA World Cup 2022: मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली रेफ्री

96

कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना जर्मनीविरुद्ध कोस्टा रिका यांच्यात खेळला गेला. जर्मनीने या सामन्यात कोस्टा रिका संघावर 4-2 अशा फरकाने मात केली. त्याचबरोबर स्टेफनी फ्रापार्ट आणि मारिया रेबेलोने या सामन्यात महिला रेफ्री म्हणून काम पाहिले. मारिया रेबेलो ही भारतीय आहे. मारिया, मूळची गोव्याची, पुरुषांच्या आय- लीग सामने आणि संतोष ट्राफीमध्ये अंपायरिंग करणारी मारिया पहिली महिला आहे.

मारिया रेबेलोने मातृभूमीशी संवाद साधताना सांगितले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जो आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा देईल. मी देशातील जवळपास सर्वच पुरुषांच्या फूटबाॅल स्पर्धांचा एक भाग आहे. नजीच्या भविष्यात आणखी महिला या व्यवसायात उतरतील.

( हेही वाचा: कोहलीची ‘विराट’ कामगिरी; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर )

मारियाची कामगिरी 

मारिया 2010 पासून संतोष ट्राॅफी स्पर्धेच्या क्लस्टर सामन्यांची रेफ्री म्हणून सक्रिय आहे. ती भारतीय महिला फुटबाॅल संघाची माजी कर्णधारही आहे. तसेच, तिची आय- लीग 2013-14 च्या हंगामासाठी रेफ्रींच्या यादीत नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर मारिया 2011 पासून फिफा- सूचिबद्ध रेफ्री आहे. तसेच, भारतात झालेल्या 17 वर्षांखालील फिफा महिला विश्वचषकादरम्यान, मारियाची स्पर्धेसाठी रेफ्री मुल्यांकनकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.