FIFA World Cup: बेल्जियम आणि मोरोक्को समर्थक भिडले; आंदोलकांनी पेटवल्या गाड्या

127

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाकडे जगभरातील फुटबाॅल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रविवारी फिफा स्पर्धेत बेल्जियमला मोरोक्कोकडून पराभव पत्कारावा लागला. मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 ने दारूण पराभव केला. याचे पडसाद बेल्जियमच्या राजधानीमध्ये पाहायला मिळाले. बेल्जियमच्या राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी गाड्या पेटवल्या.

मोरोक्कोकडून पराभवानंतर बेल्जियमध्ये हिंसाचार

मिळालेल्या माहितीनुसार, फिफा फुटबाॅल विश्वचषक सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमवर विजय मिळवल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये चाहत्यांनी निषेध करत कार आणि काही स्कूटर पेटवल्या. बेल्जियमध्ये दंगल झाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा :सामना रद्द; तरी भारताने रचला विश्वविक्रम, ‘हा’ वर्ल्ड रेकाॅर्ड झाला भारताच्या नावे )

दंगलीमागचे सूत्रधार कोण याचा शोध सुरु 

मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर रविवारी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. फुटबाॅल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. स्थानिक पोलिसांनी दंगल नियंत्रण करताना पोलिसांशी झटापट करणा-या अनेकांना ताब्यात घेतले आहे. ब्रुसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे. यावरुन दंगलीमागचे स्पष्ट कारण आणि सूत्रधार कोण आहे याचा शोध घेता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.