FIFA World Cup : फुटबॉलप्रेमींना एका कार्डावर अनेक मोफत सवलती; अन्यथा कतारमध्ये नो एंट्री! काय आहे ही भन्नाट योजना?

फिफा विश्वचषकाला २० नोव्हेंबरपासून सुरूवात झालेली आहे. या स्पर्धेचे यजनमानपद कतारमध्ये आहे. कतारमधील ८ स्टेडियमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. हा विश्वचषक २९ दिवस खेळवला जाणार असून यामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. अलिकडेच कतारने फुटबॉल पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांवर घातलेले निर्बंध हा चर्चेचा विषय झाला होता परंतु आता कतारमध्ये फुटबॉल प्रेमींसाठी फ्री सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

फिफा विश्वचषकासाठी जगभरातून फुटबॉलप्रेमी कतारमध्ये दाखल झाले आहेत. सामना पाहण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च करून तिकिटे खरेदी केली आहेत. मात्र आता फुटबॉलप्रेमींना कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचा आनंद लुटण्यासाठी हय्या कार्ड देण्यात येणार आहे. हे कार्ड फुटबॉल मॅच पाहण्यासाठी एंट्री पाससारखे आहे. याशिवाय कतारमध्ये प्रवेश शक्य होणार नाही. या कार्डधारकांनाच फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाता येणार आहे. कतारमध्ये येणाऱ्या मुलांसाठीही हे कार्ड आवश्यक आहे.

हय्या कार्डमुळे मिळणारे फायदे

  • या कार्डामुळे चाहते सामन्याच्या दिवशी सार्वजनिक वाहतूकीचा वापर विनामूल्य करू शकतात.
  • या कार्डमुळे व्हिसाची आवश्यकता भासमार नाही

कार्डासाठी नोंदणी

  • हय्या कार्डासाठी फिफाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी वैयक्तिक तपशील, कतारमधील वास्तव्याचे ठिकाणी, आपत्कालीन संपर्क ही माहिती बंधनकारक आहे.
  • २३ जानेवारी २०२३ पर्यंत फुटबॉल चाहते हे कार्ड दाखवून कतारमध्ये राहू शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here