सध्या फूटबाॅल विश्वचषक स्पर्धा सुरु आहेत. जगभरातील फूटबाॅलप्रेमी या विश्वचषकाचा आनंद घेत आहेत. परंतु विश्वचषकात वापरला जाणार चेंडू हा कसा बदलत गेला ते आपण पाहूया.
1930 साली फूटबाॅल विश्वचषकाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वप्रथम हाताने शिवलेला चामड्याचा चेंडू वापरण्यात आला होता. त्यानंतर 1934 च्या विश्वचषकात चामड्याऐवजी जाड कापडाच्या चेंडूचा प्रयोग करण्यात आला. या दरम्यान विविध संशोधने सुरु होतीच. त्यानंतर 1950 च्या विश्वचषकात एअर व्हाॅल्व्ह बसवलेला चेंडू मैदानावर अवतरला. पुढे 1986 चा विश्वचषकापासून पूर्णपणे सिंथेटिक असलेला चेंडू वापरण्याची सुरुवात झाली. चेंडूच्या या उत्क्रांतीच्या टप्प्यात तंत्रात जसा बदल होत गेला तसे चेंडूचे नावही वेळोवेळी बदलले. त्यामुळेच सध्या सुरु असलेल्या फूटबाॅल विश्वचषकाच्या अनुषंगाने आजपर्यंत या स्पर्धेत वापरण्यात आलेल्या विविध प्रकारच्या आणि नावांच्या चेंडूचा आढावा घेऊया.
Join Our WhatsApp Community