ऋजुता लुकतुके
भारताच्या फुटबॉल संघाने फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत कुवेतला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याची किमया केली आहे. मनवीर सिंगने सामन्याच्या ७५व्या मिनिटाला केलेला गोल मोलाचा ठरला. कुवेतच्या (Fifa World Cup Qualifiers) जब्बर अल अहमद आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर फुटबॉलच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
सामन्यात धसमुसळा फुटबॉल पाहायला मिळाला. आणि सुरुवातीची ७० मिनिटं भरपूर ॲक्शन असूनही गोल झाला नव्हता. शेवटी मनवीरने लालियान छांगतेच्या पासवर डाव्या पायाने अलगद बॉलला गोलजाळ्याची दिशा दाखवली. भारतीय संघाने त्यानंतर एकच जल्लोष केला.
India beats Kuwait 1-0 in FIFA World Cup Qualifiers round two
Read @ANI Story | https://t.co/igsA3o8cPu#FIFAWorldCupQualifiers #FIFA #TeamIndia #SunilChhetri #football pic.twitter.com/RP251k0fqU
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2023
भारतीय संघाचा पुढील सामना २१ नोव्हेंबरला कतारशी भुवनेश्वर इथं होणार आहे. भारताचा समावेश अ गटात झाला आहे. आणि इथे भारताबरोबर कतार, कुवेत आणि अफगाणिस्तान हे इतर तीन संघ आहेत. या संघांदरम्यान राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होतील. आणि गटातील अव्वल दोन संघ तिसऱ्या फेरीत जातील.
तिसरी फेरी महत्त्वाची असून या फेरीनंतर फिफा विश्वचषकासाठी आशिया खंडातून पात्र ठरणारे संघ ठरतील. दुसऱ्या फेरीत प्रत्येक गटातील पहिले दोन संघ आशिया चषकासाठीही पात्र ठरतील.
भारतीय संघ जागतिक फुटबॉल क्रमवारीत सध्या १०६ व्या स्थानावर आहे. आणि आतापर्यंत एकदाही संघाला तिसरी फेरी गाठता आलेली नाही.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community