- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ सध्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup Qualifiers) पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. कतार विरुद्धच्या सामन्यात भारताला तिसरा टप्पा गाठण्याची संधी होती. पण, रेफरींच्या चुकीच्या निर्णयाचा फटका भारताला बसला. १-२ अशा पराभवामुळे भारतीय संघाचं आव्हान दुसऱ्या टप्प्यातच संपल्यात जमा आहे. खरंतर ३७ व्या मिनिटाला लालियनझुलाने गोल करत भारताला आधाडी मिळवून दिली होती. पण, ही आघाडी ते टिकवू शकले नाहीत. (FIFA World Cup Qualifiers)
या गोलनंतर काही मिनिटांतच कतारच्या युसुफ आयमनने (Yusuf Ayman) गोल केला. भारतीय खेळाडू चेंडू बाद झाल्याचं अपील करत असतानाही रेफरींनी हा गोल दिला. या धक्क्यानंतर भारतीय संघ सावरलाच नाही. कतारचा संघ आशियाई स्तरावर विजेता आहे. आणि एकदा संधी मिळाल्यावर ८५ व्या मिनिटाला अहमद अल रावीने गोल करत कतारला २-१ असा विजयही मिळवून दिला. (FIFA World Cup Qualifiers)
The king of robbers Qatar robbed India of a World Cup qualifying spotpic.twitter.com/39TiYG66zh
— Troll Football (@TrollFootball) June 11, 2024
दुसऱ्या एका सामन्यात कुवेतनेही अफगाणिस्तानचा (Afghanistan) १-० पराभव करत आगेकूच सुरू ठेवली आहे. त्यामुळे आशिया खंडातून कुवेत आणि कतार हे दोन संघ पुढील फेरीत जाणार आहेत. सुनील छेत्री (Sunil Chhetri) निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघ आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. संघाची सुरुवातही चांगली झाली होती. सातत्याने चाली रचत भारतीय आघाडीच्या फळीने कतारवर दडपण कायम ठेवलं. अखेर २७ वर्षीय लालियनझुलाने (Lalianzuala) डाव्या बगलेतून आगेकूच करत वेगाने कतारचं गोळजाळं गाठलं. तडफेनं गोलकीपरला चकवत गोलही पूर्ण केला. या गोलनंतर भारतीय संघ उत्साहात होता. पण, रेफरींच्या चुकीच्या निर्णयानंतर सगळं बिघडत गेलं. (FIFA World Cup Qualifiers)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community