- ऋजुता लुकतुके
भारतातच रांची इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी जोरदार धक्का बसला. जपानकडून झालेल्या ०-१ पराभवानंतर महिला हॉकी संघाचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठीचा हा सामना होता. आणि तिसरं स्थान भारतीय महिलांना ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून देऊ शकलं असतं. (FIH Olympic Qualifier)
पण, जपान विरुद्ध भारतीय महिला संघाचा खेळ अगदीच सुमार दर्जाचा झाला. सामन्याच्या सुरुवातीला सहाव्या मिनिटाला जपानच्या काना उराटाने केलेला पेनल्टी कॉर्नरवरील गोल सामन्यातील एकमेव आणि जपानला विजयी करणारा ठरला. (FIH Olympic Qualifier)
जपानने मात्र भारताला हरवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. अमेरिका आणि जर्मनी हे इतर दोन संघही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. (FIH Olympic Qualifier)
A performance that we all can take pride in.
It just wasn’t meant to be.Full-time:
India 🇮🇳 0 – Japan 🇯🇵 1Goal Scorer:
6′ Urata Kana#HockeyIndia #IndiaKaGame #EnRouteToParis@CMO_Odisha @FIH_Hockey @IndiaSports @sports_odisha @Media_SAI @HemantSorenJMM pic.twitter.com/fT1buvb4a9— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2024
(हेही वाचा – Australian Open 2024 : नोवाक जोकोविच दिमाखात अंतिम सोळामध्ये दाखल)
…म्हणून भारतीय संघ कमी पडला
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. पण, आक्रमक बाणा जपानने दाखवला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी भारतीय गोलजाळ्यावर आक्रमण केलं होतं. पण, कर्णधार सविताने हा फटका अडवला. पण, लगेचच जपानने सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. आणि इथं काना उराटाने गोल करण्यात कसूर केली नाही. पाचव्याच मिनिटाला जपानकडे १-० अशी आघाडी आली. (FIH Olympic Qualifier)
यानंतर भारतीय महिलांनीही प्रतिहल्ल्याचे वारंवार प्रयत्न केले. पण, प्रतिस्पर्ध्यांच्या सी भागात धडक देऊनही गोलजाळ्यापर्यंत जाण्यात भारतीय संघ कमी पडला. तेवढी जिद्द भारतीय खेळाडूंना दाखवता आली नाही. बाराव्या मिनिटाला मोनिकाने तयार केलेली एक चांगली संधीही भारतीय संघाने गमावली. आणि त्यानंतर भारतीय महिला कधी जिंकतील असं वाटलंच नाही. (FIH Olympic Qualifier)
अख्ख्या सामन्यात भारताला ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण, यातील एकावरही गोल न झाल्यामुळे भारताला अखेर पराभव पत्करावा लागला. या स्पर्घेच्या अंतिम सामन्यात जर्मनीने अमेरिकन महिलांचा २-० असा पराभव करून स्पर्धा जिंकली. (FIH Olympic Qualifier)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community