ऋजुता लुकतुके
आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. हा संघ तसंच एकदिवसीय विश्वचषकासाठीचे संभाव्य १८ खेळाडू यांची एक अनिवार्य तंदुरुस्ती चाचणी अलूर इथं होणार आहे. भरगच्च क्रिकेट कार्यक्रमापूर्वी भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती तपासावी यासाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. खेळाडूंच्या फॉर्मबरोबरच त्यांची या चाचणीतील कामगिरीही विश्वचषकासाठीच्या संघाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावेल. पीटीआय वृत्तसंस्थेनं या विषयीची बातमी दिली आहे. या चाचण्यांमध्ये रक्ताच्या नमुन्यांच्या चाचण्यांबरोबरच शरीरातील व्हिटॅमिन आणि हाडांची घनताही तपासली जाणार आहे.
‘आयर्लंडच्या दौऱ्यावरून परतणाऱ्या खेळाडूं व्यतिरिक्त इतर सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी सध्या घेण्यात येईल. यात लिपिड प्रोफाईल, रक्तातील साखरेचं प्रमाण, युरिक ॲसिड, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी१२ व डी तसंच क्रिएटिनिन आणि टेस्टोस्टेरोन अशा सर्व प्रकारच्या चाचण्या होतील. एरवीही नियमितपणे या चाचण्या घेण्यात येतात. पण, आता एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआयला यात कुठलीही हयगय नकोय,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.
हेही वाचा -(Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण…)
बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकॅडमी खेळाडूंच्या फिटनेसवर काम करते. सुट्टीच्या दिवसांतही खेळाडूंना त्यांनी करायचे व्यायाम आणि डाएट यांची माहिती दिलेली असते. आणि पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून लांब राहिलेल्या खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी तशीही अनिवार्य आहे. त्यात आता महत्त्वाची स्पर्धा समोर असल्यामुळे बीसीसीआयने आणखी काटेकोरपणे खेळाडूंच्या तंदुरुस्तीची पाहणी करायची ठरवली आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी अंतिम १५ जणांचा संघ निवडण्यापूर्वी ही चाचणी पास करणं अनिवार्य असेल. यंदा अलूरमध्ये ही चाचणी पार पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community