पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन खेळाडू व दोन साहाय्यक प्रशिक्षकांचा समावेश आहे. संघातील यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप, फिरकीपटू अकिल होसैन, अष्टपैलू जस्टीन ग्रिव्हेस या खेळाडूंना लागण झाली आहे. तर, साहाय्यक प्रशिक्षक रोड्डी इस्टविच व संघाचे फिजिशियन डॉ. अक्षाई मानसिंग यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
बाधित खेळाडू मालिकेला मुकणार
वेस्ट इंडिजच्या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते मालिकेला मुकणार असून त्यांना सामन्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. सध्या या सर्वांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या या पाचही जणांना वेस्ट इंडिजच्या अन्य सदस्यांपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्याची विशेष काळजी घेतली जात असून त्यांच्या देखरेखीसाठी वैद्यकिय टीम आहे.
(हेही वाचा – हुररर्र….राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार!)
बाधित खेळाडू १० दिवस विलगीकरणात
तीन खेळाडूंसह दोन साहाय्यक प्रशिक्षकांना बाधा झाल्याने पुढील १० दिवस ते विलगीकरणात राहतील. या सर्वांचा पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच हा कालावधी संपेल, अशी माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली.
Join Our WhatsApp Community