Football Coach Punches Referee : ‘या’ क्लबच्या व्यवस्थापकाने फुटबॉल रेफरीलाच लगावला ठोसा 

या विचित्र घटनेनंतर ‘या’ देशातील फुटबॉल लीग स्पर्धाच बरखास्त करण्यात आली आहे 

214
Football Coach Punches Referee : ‘या’ क्लबच्या व्यवस्थापकाने फुटबॉल रेफरीलाच लगावला ठोसा 
Football Coach Punches Referee : ‘या’ क्लबच्या व्यवस्थापकाने फुटबॉल रेफरीलाच लगावला ठोसा 

ऋजुता लुकतुके

टर्कीमध्ये लीग फुटबॉलच्या एका (Football Coach Punches Referee)सामन्या दरम्यान विचित्र प्रकार घडला. मंगळवारी अंकारा इथं अंकारागुसु संघाचा सामना रिझेस्पोर या संघाशी होता. आणि सामन्या दरम्यान पंचांचा एक निर्णय न पटल्यामुळे मैदानात थोडी बाचाबाची झाली. पण, या भांडणाचं पर्यवसान चक्क अंकारा क्लबचे अध्यक्ष फारुक कोका यांनी पंचांच्या तोंडात ठोसा लगावण्यात झालं.

मैदानावरील या अशिष्ट आणि अखिलाडू प्रकारानंतर टर्की फुटबॉल फेडरेशनने (Football Coach Punches Referee ) लीगमधील पुढचे सामने रद्द करून लीग ताबडतोब बरखास्त केली आहे. या सामन्याचं प्रसारण राष्ट्रीय वाहिनीवर सुरू होतं. त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं ते आपणही पाहू शकतो.

सामन्याच्या ९७ व्या मिनिटाला रिझेस्पोअर संघाने १-१ अशी बरोबरी साधणारा गोल केला. आणि गोलचा हा निर्णय न पटल्यामुळे अंकारा संघाचे व्यवस्थापक आणि अध्यक्षही मैदानात खेळाडूंच्या बाजूने उतरले. त्यानंतर काही मिनिटांत अध्यक्षांनी चक्क पंच हलिल उमुट मेमर यांना ठोसा लगावलेला या व्हीडिओतही दिसतंय.

प्रकरण तेवढ्यावर मिटलं नाही, तर अंकारा क्लबचे पाठिराखेही पाठोपाठ मैदानात उतरले. आणि पंच हलिल मेमर यांना आणखी लाथा आणि बुक्के खावे लागले. शेवटी हलिल यांना ड्रेसिंग रुममध्ये सुरक्षितपणे हलवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

या घटनेनंतर टर्किश फुटबॉल फेडरेशनने घाई घाईत देशातील सगळेच लीग सामने रद्द केले आहेत. त्यासाठी काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलंय की, संबंधित क्लब, क्लबचे अध्यक्ष, संबंधित खेळाडू आणि (Football Coach Punches Referee ) व्यवस्थापक यातील जे जे दोषी असतील त्यांना कडकात कडक शिक्षा केली जाईल. प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. दोन जणांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं आहे.’

हलिल मेमर हे फिफाची मान्यता असलेले पंच आहेत. आणि २०१८ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पंचगिरी करत आले आहेत. टर्की देशात पंचांना संघांचे व्यवस्थापक आणि अध्यक्षांनी विरोध केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण, यावेळी मजल पंचांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे फुटबॉल विश्वातच हे प्रकरण गाजत आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.