महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

141

महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते परंतु कालांतराने त्यांची प्रकृती खालावत गेली अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती पेले यांची मुलगी नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. ३ वेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांनी १९५८, १९६२, १९७० अशी ३ विजेतेपद मिळवली आहेत.

( हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक : राजकीय वर्तुळातून हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली )

कर्करोगाशी झुंज अपयशी

फुटबॉल जगतात अनेक खेळाडूंचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न असते. या महान फुटबॉलपटूने तब्बल ३ वेळा विश्वचषक जिंकला आहे. म्हणूनचं पेले यांना फुटबॉल जगातील देव असेही म्हटले जात होते. फिफानेही पेले यांना महान खेळाडू असे लेबल दिले होते. पेले यांच्यामुळे ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून ओळखला होता. मागील काही दिवसांपासून पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पेले यांनी जवळपास १२८२ गोल केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.