- ऋजुता लुकतुके
इंडोनेशियात एका क्लब स्तरावरील सामन्यात एका फुटबॉलपटूचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला. एफसी बांडुंग आणि एफबीआय सुबांग या क्लब दरम्यान हा प्रदर्शनीय सामना सुरू होता. आणि मैदानावर प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. सामना नुकताच सुरू झाला होता आणि ही दुर्दैवी घटना घडली. ३५ वर्षीय खेळाडूवर वीज पडून तो मैदानातच कोसळला. (Football On Field Death)
स्थानिक वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, खेळाडू या अपघातानंतरही जीवंत होता. पण, रुग्णालयात नेल्यानंतर तो उपचारांना प्रतिसाद देऊ शकला नाही. (Football On Field Death)
(हेही वाचा – Bilkis Bano Case : गुजरात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल)
Tragjedi në futboll, rrufeja i merr jetën lojtarit në fushën e lojës. 😳#newsport #indonesia #thunder #football #tragedy #SeptainRaharja pic.twitter.com/YijLAkv7yO
— Newsport Albania (@NewsportAlbania) February 12, 2024
फुटबॉलमध्ये असे अपघात नवीन नाहीत. गेल्यावर्षी इंडोनेशियामध्येच फुटबॉलच्या मैदानात सोरेटिन चषक स्पर्धेत अंगावर वीज कोसळून एका १७ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला होता. तर ब्राझीलमध्येही २१ वर्षीय कायो हेनरिक् दि लिमा गोनकाल्व्हिस यालाही क्लब स्तरावरील सामना खेळताना वीज पडून जीव गमवावा लागला होता. (Football On Field Death)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community