माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मणचा गुरुवार, ०२ नोव्हेंबर ४९ वा वाढदिवस आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांचा वाढदिवस दे धमाल पद्धतीने साजरा झाला. (V V S Laxman Birthday)
माजी दिग्गज क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मणचा ४९ वा वाढदिवस बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत साजरा झाला. तिथल्या परंपरेप्रमाणे केक चेहऱ्यावर फासून तिथल्या खेळाडूंनी हा वाढदिवस साजरा केला. यात आघाडीवर होता तो तिथे दुखापतीवर उपचार घेणारा रिषभ पंत. त्यानेच या वाढदिवसाचा व्हीडिओही ट्विटरवर शेअर केला आहे. (V V S Laxman Birthday)
व्ही व्ही एस लक्ष्मण हा क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. तर रस्ते अपघातानंतर मागची दीड वर्षं रिषभ पंत बंगळुरूत राहून तिथल्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. तो तिथे असताना त्यानेच जंगी वाढदिवस साजरे करण्याची पद्धत सुरू केली. यापूर्वी के एल राहुल आणि श्रेयस अय्यरचा वाढदिवसही असाच साजरा झाला होता. (V V S Laxman Birthday)
आता लक्ष्मणच्या वाढदिवसालाही सगळ्याचा उत्साह कायम होता. (V V S Laxman Birthday)
Happy birthday @VVSLaxman281 sir 🥳 pic.twitter.com/7xtoeBsuBf
— Rishabh Pant (@RishabhPant17) November 1, 2023
(हेही वाचा – ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम)
व्ही व्ही एस लक्ष्मण २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर लक्ष्मणने क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली. राहुल द्रविड सुटीवर असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही लक्ष्मण काम पाहतो. (V V S Laxman Birthday)
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या संघाचे प्रशिक्षकपदही त्याने सांभाळले होते. लक्ष्मणने कसोटी क्रिकेटमध्ये १३४ सामन्यांमध्ये लक्ष्मणने ८७८१ धावा केल्या त्या ४६ धावांच्या सरासरीने. यात त्याने १७ शतकंही ठोकली आहेत. (V V S Laxman Birthday)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community