बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक ऑपरेशन्सपदी अभय कुरुविला यांची नियुक्ती

165

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महाव्यवस्थापक ऑपरेशन्सपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पूर्वी या पदावर धीरज मल्होत्रा होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर अभय कुरुविला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अपेक्स कौन्सिलने बुधवारी त्यांची नव्या भूमिकेत नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – शिवसेनेचा ‘हा’ पदाधिकारी मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला बुडवणार का?)

कोण आहे अभय कुरुविला?

53 वर्षीय कुरुविला 90 च्या दशकातील भारतीय संघातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. पण त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. हा असा काळ होता जेव्हा भारतीय संघात वेगवान गोलंदाजांची कमतरता होती. कुरुविलाने त्यावेळी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कुरुविलाने 10 कसोटींमध्ये 3.03 च्या इकॉनॉमीसह 35.7 च्या सरासरीने 25 बळी घेतले. त्याने देशासाठी 25 एकदिवसीय सामने देखील खेळले, ज्यात त्याने 4.72 च्या इकॉनॉमीने 25 विकेट घेतल्या. मुंबईचा खेळाडू कुरुविलाने 2000 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, 26 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. आयपीएल 2022 चा 15 वा सीझन कोरोना नियमांचे पालन करून भारतात आयोजित केला जाणार आहे तर या लीगमध्ये 70 सामने होतील. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे या चार ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.