- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) आयपीएलच्या (IPL) पुढील हंगामासाठी पंजाब संघाचे क्रिकेट संचालक म्हणून परतले आहेत. (Sanjay Bangar Punjab King’s DofC)
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) आयपीएलच्या (IPL) पंजाब किंग्ज संघात परतले आहेत. पण, यावेळी त्यांची भूमिका थोडीशी बदलेली असेल. ते आता क्रिकेट संचालक म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी संघाचं नाव किंग्ज इलेव्हन पंजाब असताना बांगर २०१४ ते २०१६ या कालावधीत संघाचे प्रशिक्षक होते. (Sanjay Bangar Punjab King’s DofC)
(हेही वाचा – India’s Forex Reserve on High : भारताची परकीय गंगाजळी चार महिन्यांतील उच्चांकावर)
बांगर (Sanjay Bangar) यांच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने २०१४ ची आयपीएल (IPL) अंतिम फेरी गाठली होती. तर २०१४ पासून संजय बांगर भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) फलंदाजी प्रशिक्षक होते. विराट कोहलीने वारंवार आपल्या विराट आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचं श्रेय संजय बांगर (Sanjay Bangar) यांना दिलं आहे. (Sanjay Bangar Punjab King’s DofC)
We are delighted to announce the return of our sher, Sanjay Bangar as the new Head of Cricket Development at Punjab Kings.
Mr. Bangar brings a wealth of experience and expertise to our organization, and we are confident that under his leadership, our cricket development… pic.twitter.com/oDamatwpYg
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 8, 2023
(हेही वाचा – MLA Nawab Malik : मलिकांना सत्ताधारी बाकावर बसवण्याचा नक्की गेम कोणाचा?)
मागच्या तीन हंगामात बांगर (Sanjay Bangar) हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. यातील पहिल्या दोन हंगामात संघ बाद फेरीत पोहोचला. तर गेल्यावर्षी संघाची बाद फेरी थोडक्यात हुकली होती. संजय बांगर (Sanjay Bangar) यांची राष्ट्रीय संघासाठीची कारकीर्द मात्र अल्पजीवी ठरली. भारतासाठी ते १२ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आणि यात त्यांनी ४६० कसोटी धावा केल्या तर १८० एकदिवसीय धावा केल्या. (Sanjay Bangar Punjab King’s DofC)
१६५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये मात्र त्यांनी ८,३५० च्या वर धावा आणि ३०० बळी टिपले आहेत. (Sanjay Bangar Punjab King’s DofC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community