- ऋजुता लुकतुके
बंगालचा रणजी कर्णधार आणि भारताचा माजी कसोटीपटू मनोज तिवारीने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण, अचानक त्याने निवृत्ती मागे घेतली आहे. कारण, यशस्वी क्रिकेट कारकीर्दीतलं एक स्वप्न त्याला अजून पूर्ण करायचं आहे. माजी आंतरराष्ट्रीय कसोटीपटू मनोज तिवारीने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. तो आणखी फक्त एक वर्ष क्रिकेट खेळणार आहे. आणि आपल्या निर्णयातला हा बदल त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांच्या सांगण्यावरून केला आहे.
बंगालच्या संघाला रणजी विजेतेपद मिळवून देणं हे आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर पडल्यावर मनोज तिवारीचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं. दोनदा त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीतही पोहोचला. पण, चषकावर नाव काही कोरू शकला नाही. बंगालंच शेवटचं रणजी विजेतेपद आहे १९८८-८९ हंगामातलं. गेल्यावर्षी अंतिम फेरीत बंगालच्या संघाला संधीही होती. पण, अखेर सौराष्ट्र संघाने बंगालचा ९ गडी राखून पराभव केला. आता बंगाल क्रिकेट असोसिएशनला वाटतंय की, संघ चांगला जमून आलेला असताना कर्णधारानेच निवृत्त होणं योग्य नाही. त्यामुळे अध्यक्ष स्नेहाशिष आणि मनोज तिवारीची पत्नी यांनी त्याला निवृत्ती मागे घेण्यासाठी गळ घातली. आणि मनोज तिवारी त्यासाठी तयार झालाय. आणखी एक वर्ष बंगाल क्रिकेटसाठी द्यायला आता तो तयार आहे.
Sometimes our last chance becomes our first Success 👍
Giving it myself one more year for bengal cricket team to play and win the Ranji trophy with my teammates 🏆 So I’m back playing the game which has been my passion and love all my life ❤️
Sorry for the inconvenience 🙏 pic.twitter.com/6kyFhNQjJv— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) August 8, 2023
(हेही वाचा – ऑगस्टमध्ये राज्यात पाऊस कमीच राहणार)
‘बंगाल संघाचं नेतृत्व ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. २०२९ आणि नंतर २०२२ मध्ये आम्ही अंतिम फेरीतही पोहोचलो. आता एक शेवटचा प्रयत्न मी करणार आहे. आणि त्यासाठी निवृत्ती मागे घेत आहे.’ कोलकात्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या पत्रकार परिषदेत तिवारीने आपल्या भावना व्यक्त केल्या. अलीकडच्या यशस्वी रणजी मोसमांनंतर अचानक निवृत्तीचा निर्णय तिवारीने घेतला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. इन्स्टाग्रामवरची त्याची पोस्ट घरच्यांसाठीही धक्का देणारी होती. पण, आता निवृत्तीचा निर्णय मागे घेणारी पोस्टही त्याने शेअर केली आहे.
३ ऑगस्ट रोजी त्याने निवृत्तीची पोस्ट टाकली होती. खरंतर रणजीमध्ये मनोज तिवारीची कामगिरी दमदार होती. आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी फक्त ९२ धावांची गरज आहे. १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने १९ शतकं ठोकली आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ सामन्यांत त्याने २८७ धावा केल्या आहेत. मनोज तिवारी राजकारणातही सहभागी असून तो तृणमूल काँग्रसचा सदस्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community