विराट कोहलीच्या जागी मी असतो, तर लग्न केलं नसतं! असे का म्हणतो शोएब अख्तर?

141

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीची कामगिरी आणि त्याच्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे. अख्तर म्हणाला की, कोहलीने लवकर लग्न केलं. लग्नाच्या दबावामुळेच त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. कोहलीने 120 शतकं पूर्ण केल्यानंतरतच लग्न करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं अख्तर म्हणाला. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अख्तरला एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलत होता. तेव्हा एनआयएने विचारले की, अलीकडेच विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) समोरासमोर आले होते. हे किती चुकीचे आहे? यावर अख्तर म्हणाला की, किती बरोबर आणि किती चुकीचे हे मला माहीत नाही, पण जे झाले ते झाले. आता इथून पुढे कसे जायचे. याचा विचार व्हायला हवा.

 कोहलीवर कामगिरीचे दडपण

अख्तर पुढे म्हणाला की, विराट कोहलीच्या हातात बॅट आहे. त्याला संधी आहेत. आता इथून त्याला तीनपैकी कोणत्याही प्रकारातून बाद होऊन चालणार नाही. आता त्याच्यावर कामगिरी उत्तम ठेवण्याचे दडपण असेल. त्याने 120 शतके ठोकावीत अशी माझी इच्छा होती. त्याने कर्णधारही होऊ नये आणि 120 शतकं पूर्ण केल्यानंतरच लग्न करावं असं मला वाटत होतं.

‘मी भारतात असतो, तर कधीच लग्न केलं नसतं’

जर मी भारतात राहत असतो, आणि इथे स्टार खेळाडू असतो, तर मी 400 बळी घेतल्याशिवाय, लग्न करण्याचा विचार केला नसता, मी माझ्या देशाप्रती असणा-या जबाबदारीला प्रथम महत्त्व दिलं असतं. मी लग्न करुन माझ्या जबाबदा-या वाढवल्या नसत्या, हा माझा वैयक्तिक निर्णय असता. विराटने लग्न केले हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, असं अख्तर म्हणाला.

( हेही वाचा: बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल )

कोहलीला दोन वर्षे शतक झळकावता आलं नाही

खरंतर, विराट कोहलीने सप्टेंबर 2021 मध्ये T20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले आणि रोहित शर्माकडे दोन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवले. अलीकडेच विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआय आता कसोटीत नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. विराट धावा करतो आहे, पण त्याचे मोठ्या डावात त्याला रूपांतर करता आले नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक मारलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.