Formula 1 Driver : भारताचा कुश मायेनी अल्पाईन एफ१ संघाचा राखीव ड्रायव्हर

Formula 1 Driver : कार्तिकेयन, करुण चंडोकनंतर कुश भारताचा तिसरा फॉर्म्युला वन ड्रायव्हर ठरला आहे. 

31
Formula 1 Driver : भारताचा कुश मायेनी अल्पाईन एफ१ संघाचा राखीव ड्रायव्हर
  • ऋजुता लुकतुके

अल्पाई फॉर्म्युला वन संघाने भारतीय ड्रायव्हर कुश मायेनीची चाचणी तसंच राखीव ड्रायव्हर म्हणून निवड केली आहे. यामुळे कुश हा नरेन कार्तिकेयन आणि करुण चांडोक यांच्या खालोखाल फॉर्म्युला वन सर्किटवरील तिसरा भारतीय ठरला आहे. कुश सध्या अल्पाईन अकॅडमीतच प्रशिक्षण घेत आहे आणि फ्रँको कोलापिंटो, रायो हिराकावा आणि पॉल एरॉन यांच्या बरोबरीने तो तो चाचणी ड्रायव्हर असेल. तर मुख्य स्पर्धेत अल्पाईनकडून पिअर गॅसली आणि जॅक दुहान हे ड्रायव्हर उतरणार आहेत. (Formula 1 Driver)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?)

‘आमच्याच अकादमीत तयार झालेल्या कुश मायेनीची चाचणी आणि राखीव ड्रायव्हर म्हणून निवड करताना आम्हाला आनंद होत आहे. अकादमीत तयार होत असताना त्याने स्वत:मध्ये घडवून आणलेल्या प्रगतीबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्याच्याबरोबरचं नातं आणखी घट्ट करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे,’ असं अल्पाईन संघाने कुशची निवड करताना म्हटलं आहे. राखीव ड्रायव्हर म्हणून कुश मायेनी कंपनीच्या फॉर्म्युला नव कार विकासात कुशची आता महत्त्वाची भूमिका असेल. अल्पाईनच्या टीसीपी कार्यक्रमाचा कुश भाग असेल. या अंतर्गत, चालकाला कारमध्ये बसल्यावर मिळणारा अनुभव कसा सुधारता आणि अद्ययावत करता येईल यावर संशोधन केलं जातं. त्यासाठी कुश चालक म्हणून मदत करणार आहे. (Formula 1 Driver)

(हेही वाचा – IndusInd Bank Share Price : इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये २७ टक्क्यांची घसरण का झाली?)

२४ वर्षीय कुश कर्नाटकमधून येतो आणि २०२३ मध्ये अल्पाईन अकादमीत दाखल झाल्यापासून फॉर्म्युला २ शर्यतीत आतापर्यंत त्याने चांगली कामगिरी केली आहे. हंगेरीतील एफ२ रेस जिंकतानाच इतर सहा स्पर्धांमध्ये त्याने पहिल्या तीनांत स्थान मिळवलं होतं. कुशने गेल्यावर्षीच्या एफ२ हंगामात ड्रायव्हरच्या क्रमवारीत तेरावं स्थान मिळवलं होतं. त्याचा इन्व्हिक्चा रेसिंग संघातील आधीचा साथीदार ग्रॅब्रिएल बोर्टोलेटोला त्या हंगामात विजेतेपद मिळालं. त्यानंतर बोर्टोलेटोला सॉबर-फेरारी संघात स्थान मिळालं आहे. अल्पाईनबरोबर फॉर्म्युला वन कारच्या चाचणीत कुश नियमितपणे सहभागी होईल आणि स्वत: फॉर्म्युला २ हंगामही तो अल्पाईनकडून खेळणार आहे. (Formula 1 Driver)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.