Sport : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि छबिलदास शाळेच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा उपक्रमाचे चौथे वर्ष

80

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ मध्ये पहिला ऑलिंपिक क्रीडा (Sport) उपक्रम सुरू करण्यात आला. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.  शनिवार, १९ एप्रिलपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी तसेच निवडक मुलांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

याकरता राजन जोथाडी (मुष्टियुद्ध), स्वप्निल परब (धनुर्विद्या), विनोद जगताप (तलवारबाजी) आणि अशोक कारंडे (शूटींग) हे प्रशिक्षक असणार आहेत.

sport 1

मुली मुळातच कणखर असतात, एका वेळी अनेक गोष्टी करण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे कुठलाही खेळ मुलींसाठी वेगळा राहिला नाही. मूल-मुली भेद आता संपलेला आहे. छबिलदास शाळेचे व्यवस्थापक आणि त्यांचे साळवे सर यांचे आभार मानते. त्यांनी छबिलदास शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केला, आज याचे चौथे वर्ष आहे. ही मुले आपल्याकडे येवून प्रशिक्षण घेत आहेत. मोबाईल हे आता मुलांचे खेळणे झाले आहे. मैदानात जाणेच मुले विसरली आहेत. अशा वेळी जर आपल्याला ऑलिंपिक खेळाडू घडवायचे असतील तर लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे आहे.
 मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

(हेही वाचा मुस्लिमांच्या अंधश्रद्धांवर गप्प बसणारे दाभोलकर आणि मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार होताना मौन बाळगणारे गांधी एकच; Ranjit Savarkar यांचा हल्लाबोल)

आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी खेळाचे प्रशिक्षण महत्वाचे ठरते. उत्तम खेळाडू घडवण्यासाठी सावरकर स्मारकातील उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी छबिलदास शाळेने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सावरकर स्मारकात चालणार्‍या तलवारबाजी (फेन्सिंग), मुष्टियुद्ध (बॉक्सिंग), तिरंदाजी (आर्चरी) आणि नेमबाजी (शूटींग) या चार क्रीडा (Sport) प्रकारातील प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

sport 3

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिंपिक क्रीडा (Sport) उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी तसेच निवडक मुलांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 कोमल कडवे, मुख्याध्यापक, छबिलदास इंग्लिश मिडियम स्कूल 

या कार्यक्रमात सुरुवातीला या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच क्रीडाविषयक (Sport) चार प्रकारांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यावेळी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन (जीईआय)चे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.

sport 2

या उपक्रमानुसार सावरकर स्मारकातील काही उपक्रमांचा फायदा शाळेने आपल्या मुलांना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक मुलांना या योजनेमुळे क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचा फायदा मिळणार आहे. याद्वारे सावरकर स्मारकात चालविल्या जाणाऱ्या तलवारबाजी (फेन्सिंग), मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग), तिरंदाजी (आर्चरी) आणि नेमबाजी म्हणजेच शूटिंग या क्रीडा (Sport) प्रकारातील प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
शैलेंद्र साळवी, अध्यक्ष, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.