Frank Duckworth Dies : डकवर्थ – लुईस नियमाचे जन्मदाते फ्रँक यांचं ८४ व्या वर्षी निधन

Frank Duckworth Dies : सामन्यात व्यत्यय आल्यास सुधारित लक्ष्य ठेवण्याचं गणित डरवर्थ आणि लुईस यांनी मांडलं होतं 

74
Frank Duckworth Dies : डकवर्थ - लुईस नियमाचे जन्मदाते फ्रँक यांचं ८४ व्या वर्षी निधन
Frank Duckworth Dies : डकवर्थ - लुईस नियमाचे जन्मदाते फ्रँक यांचं ८४ व्या वर्षी निधन
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमधील डकवर्थ – लुईस नियमाचे एक जन्मदाते फ्रँक डकवर्थ (Frank Duckworth Dies ) यांचं ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याचं निधन २१ जूनला झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. डकवर्थ हे ब्रिटिश नागरिक होते. आणि १९९०च्या दशकात त्यांनी टोनी लुईस या सहकारी गणितज्जाच्या मदतीने डकवर्थ – लुईस नियम शोधून काढला. क्रिकेट सामन्यात पाऊस किंवा इतर कशाने व्यत्यय आल्यास सुधारित लक्ष्य ठरवणारं गणित या दोघांनी मांडलं होतं. १९९७ मध्ये पहिल्यांदा या प्रणालीचा वापर झाला. २००१ मध्ये आयसीसीनेही ही पद्धत अधिकृतपणे स्वीकारली. (Frank Duckworth Dies )

 त्यानंतर आयसीसी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा आणि मालिका यांच्यात डकवर्थ – लुईस नियमाचा वापर सुरू झाला. डकवर्थ आणि लुईस निवृत्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील (Australia) एक संख्याशात्र प्राध्यापक स्टिव्हन स्टर्न (Steven Stern) यांनी नियमात काही बदल केले. त्यानंतर या पद्‌धतीला डकवर्थ – लुईस – स्टर्न असं नाव मिळालं. (Frank Duckworth Dies )

(हेही वाचा- Hindu : हिंदूंची घटती लोकसंख्या देशासाठी धोक्याची घंटा; मंजिरी मराठे यांनी मांडले वास्तव)

डकवर्थ आणि लुईस या दोघांनाही त्यांच्या संख्याशास्त्रातील योगदानासाठी २०१० मध्ये ब्रिटिश राजसत्तेकडून गौरव करण्यात आला होता. क्रिकेटमध्ये पावसामुळे षटकं वाया गेली तर सुधारित लक्ष्य कसं ठरवायचं हे सांगणारी ही अत्यंत आधुनिक पद्धती मानली जाते. यात दोन्ही बाजूंनी गमावलेले गडी, हातात असलेली षटकं, धावगती वाया गेलेली षटकं अशा सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. संख्याशास्त्रातील एक किचकट पण, परिणामकारक पद्धती म्हणून डकवर्थ – लुईस प्रणालीकडे पाहिलं जातं. (Frank Duckworth Dies )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.