Women’s Cricket : भारतीय महिला संघांच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने महिलांच्या सामन्यांना प्रेक्षकांना मोफत प्रवेश द्यायचं ठरवलं आहे. 

247
Women's Cricket : भारतीय महिला संघांच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश
Women's Cricket : भारतीय महिला संघांच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश
  • ऋजुता लुकतुके

महिला क्रिकेटला (Women’s Cricke) प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) महिलांच्या सामन्यांना प्रेक्षकांना मोफत प्रवेश द्यायचं ठरवलं आहे. (Women’s Cricket)

भारतीय महिला क्रिकेट संघ येणाऱ्या दिवसांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघांसमोर घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहे आणि या मालिकेतील मुंबईत होणाऱ्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश असणार आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलं आहे. (Women’s Cricket)

२९ नोव्हेंबरपासून भारतीय महिला ए संघ इंग्लंडच्या ए संघाविरुद्ध तीन टी-२० (T-20) सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे तीनही सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहेत. २९ नोव्हेंबर, १ डिसेंबर आणि ३ डिसेंबरला दुपारी दीड वाजल्यापासून हे सामने सुरू होतील. (Women’s Cricket)

या सामन्यांसाठी तिकिटं खरेदी करण्याची गरज नाही. (Women’s Cricket)

तर महिलांचा वरिष्ठ संघ ६ डिसेंबरपासून इंग्लिश महिला संघाबरोबर टी-२० (T-20) मालिका खेळणार आहे. ६ डिसेंबर, ९ डिसेंबर आणि १० डिसेंबरला हे सामने वानखेडे मैदानातच रात्री आठ वाजल्यापासून रंगतील. या सामन्यांनाही प्रेक्षकांना मोफत प्रवेश असेल. (Women’s Cricket)

(हेही वाचा – Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक)

‘प्रेक्षकांना प्रवेश मोफत असेल तर स्टेडिअमही भरेल आणि महिला क्रिकेटलाही त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी अध्यक्ष अमोल काळे यांनी मोफत प्रवेशाचा निर्णय घेतला आणि कार्यकारिणीने त्याला पाठिंबा दिला,’ असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले. (Women’s Cricket)

भारतीय संघ इंग्लिश महिला संघाबरोबर वाशीत डी वाय पाटील स्टेडिअमवर एक कसोटी सामनाही खेळणार आहे आणि इथंही प्रवेश मोफत असेल. तर इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर येईल. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या दौऱ्यात एकमेव कसोटी सामना मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होईल आणि त्यानंतरचे तीन टी-२० सामने वाशीत डी वाय पाटील स्टेडिअमवर होतील. मालिकेचं हे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. (Women’s Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.