French Open 2024 : झ्वेरेवची लढत मोडून काढत कार्लोस अल्काराझचं पहिलं वहिलं फ्रेंच विजेतेपद 

French Open 2024 : अल्काराझने झ्वेरेवचा ६-३, २-६, ५-७, ६-१ आणि ६-२ असा पराभव केला 

156
French Open 2024 : झ्वेरेवची लढत मोडून काढत कार्लोस अल्काराझचं पहिलं वहिलं फ्रेंच विजेतेपद 
French Open 2024 : झ्वेरेवची लढत मोडून काढत कार्लोस अल्काराझचं पहिलं वहिलं फ्रेंच विजेतेपद 
  • ऋजुता लुकतुके

यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा (French Open 2024) नियमित चाहत्यांसाठीही भावनिक होती. लाल मातीवर १४ वेळा विजेतेपद पटकावणारा राफेल नदाल पहिल़्याच फेरीत स्पर्धेबाहेर झाला. दुखापतीमुळे तो आव्हानही उभं करू शकला नाही. तर त्याच्या खालोखाल इथं यशस्वी झालेला नोवाक जोकोविच तिसऱ्या फेरीत बाहेर पडला. आता स्पर्धेला गरज होती ती या दोघांची जागा घेणाऱ्या टेनिसपटूची. सध्या ती जागा कार्लोस अल्काराझने घेतली आहे.  (French Open 2024)

(हेही वाचा- Bus Terror Attack : जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात!)

अलेक्झांडर झ्वेरेवचा ६-२, २-६, ५-७, ६-१ आणि ६-२ असा पराभव करत स्पेनच्याच (Spain) नदालचा आपण वारसदार असल्याचा दावा आता कार्लोस अल्काराझने केला आहे. अल्काराझला सामन्यादरम्यान पायात गोळे आले. मैदानावरच त्याला उपचार घ्यावे लागले. पण, पठ्ठ्याने हार मानली नाही. शेवटपर्यंत झगडत विजय साध्य केला. (French Open 2024)

 फिलीप कॉर्टिअर (Philippe Cortier) कोर्टवर ४ तास १९ मिनिटं हा सामना चालला. २१ वर्षीय अल्काराझ १ विरुद्ध २ सेटनी पिछाडीवर पडला होता. पण, त्याने मुकाबला सुरूच ठेवला. आता क्ले, ग्रास आणि हार्डकोर्टवर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो वयाने सगळ्यात लहान टेनिसपटू ठरला आहे. २०२२ मध्ये त्याने अमेरिकन ओपन जिंकली होती. गेल्यावर्षी विम्बल्डनमध्ये अंतिम फेरीत त्याने नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. आणि आता फ्रेंच ओपनही त्याने नावावर केली आहे.  (French Open 2024)

 अल्काराझची आता नजर पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनवर असेल. लहान वयात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी त्याच्याकडे असेल. राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांनी आतापर्यंत ही किमया केली आहे. पण, अल्काराझ आता फक्त २१ वर्षांचा आहे. आणि आताच त्याने आपली विजेतेपदांची भूक दाखवून दिली आहे. (French Open 2024)

(हेही वाचा- Bandra Terminus : वांद्रे टर्मिनस येथे कोणकोणत्या सुविधा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात?)

दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेवला ग्रँडस्लॅम विजेतेपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. यापूर्वी तीनदा तो अंतिम फेरीत पराभूत झाला आहे. २०२०च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत तो डेव्हिड थिमकडून पराभूत झाला होता. (French Open 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.