- ऋजुता लुकतुके
भारताची बॅडमिंटनमधील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Sattviksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांचं फ्रेंच ओपन सुपर सीरिजवरील वर्चस्व कायम राहिलं आहे. दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकताना दोघांनी रविवारी चिनी-तैपाईच्या ली झे हुई आणि यांग पो हुआन या जोडीचा सरळ गेममध्ये २१-११, २१-१७ असा धुव्वा उडवला. अवघ्या ३७ मिनिटांत अंतिम सामना संपला. भारतीय जोडीने ७५० रेटिंग गुण असलेल्या या मानाच्या स्पर्धेत २०२२ नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. (French Open Badminton)
(हेही वाचा- Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जय श्रीराम’च्या घोषणा)
भारतीय जोडी सध्या जागतिक स्तरावर नंबर वन जोडी आहे. पण, नवीन वर्षी दोघंही स्पर्धा जिंकू शकलेले नव्हते. ती कसर त्यांनी भरून काढली. (French Open Badminton)
FIRST TITLE OF THE YEAR 🏆🔥
Satwik-Chirag win their 2️⃣nd #FrenchOpen and 2️⃣nd #Super750 title 🥳
Well done boys, proud of you!@himantabiswa | @sanjay091968 | @Arunlakhanioffi
📸: @badmintonphoto#FrenchOpen2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/TR9ZG901SC
— BAI Media (@BAI_Media) March 10, 2024
विशेष म्हणजे या स्पर्धेत सात्त्विकसाईराज आणि चिराग यांनी एकही गेम गमावला नाही. अंतिम फेरीतही नेटजवळचा खेळ आणि ड्रॉप शॉट या दोन्ही बाबतीत भारतीय जोडी सरस ठरली. अवघ्या पंधरा मिनिटांत प्रतिस्पर्ध्यांना काही कळायच्या आतच पहिला गेम दोघांनी नावावर केला. आणि दुसऱ्या गेममध्ये सात्त्विकसाईराजकडून थोड्या चुका झाल्या. पण, दोघांनी आक्रमण सोडलं नाही. आणि खेळाचा वेग कायम ठेवत दुसरा गेमही २१-१७ असा जिंकला. आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्णानंतर या जोडीने पहिल्यांदा मोठी स्पर्धा जिंकली आहे. (French Open Badminton)
(हेही वाचा- Coastal Road : कोस्टल रोड ‘या’ दोन दिवशी राहणार बंद, एवढेच दिवस आणि एवढ्या वेळातच करता येईल प्रवास)
पण, एकंदरीत मागचं वर्षभर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत १००० रेटिंग गुण असलेल्या मलेशिया ओपन आणि चायना मास्टर्स स्पर्धेत भारतीय जोडी उपविजेती होती. तर इंडियन ओपन स्पर्धेतही दोघं अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. पण, विजेतेपद मिळवण्यात ते कमी पडले होते. ती कसर त्यांनी आवडत्या फ्रेंच ओपनमध्ये पूर्ण केली. (French Open Badminton)
भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सात्त्विकसाईराज आणि चिराग यांना पॅरिस ऑलिम्पिकसाठीचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. (French Open Badminton)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community