फलंदाजांना रन आऊट करायच्या नादात विकेट कीपरनेच काढले दोन रन, बघा मजेदार व्हिडिओ

97

क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा काही गंमतीशीर घटना घडतात आणि आपल्याला खो-खो हसवतात. असाच काहीसा विनोदी प्रकार पाकिस्तानातील मुलतानच्या मैदानावर घडला आहे. यावेळी पाकिस्तानच्या फलंदाजांना रन आऊट करण्याच्या नादात चक्क बांग्लादेशच्या विकेट कीपरनेच दोन धावा काढल्या असल्याचा प्रकार घडला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

काय झाले नेमके?

मुलतानच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेशच्या अंडर-19 संघांमध्ये कसोटी सामना रंगला होता. पाकिस्तानी फलंदाज फलंदाजी करत असताना त्यांना रन आऊट करण्याची संधी बांग्लादेशच्या खेळाडूंना असताना मैदानात अचानक एकच गोंधळ उडाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या एका खेळाडूने कव्हरला एक फटका मारला आणि चेंडू क्षेत्ररक्षकापासून लांब असल्यामुळे फलंदाजांनी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही फलंदाजांमध्ये योग्य समन्वय साधला न गेल्याने फलंदाजांमध्ये चुकामुक झाली आणि दोन्ही फलंदाज एकाच बाजूला म्हणजे स्ट्राइकर एंडला येऊन थांबले.

https://twitter.com/_kezx/status/1596058266462724097?s=20&t=kZWmzEXpw2ShWW9CQKcbHQ

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

याचा फायदा विकेट कीपरने घ्यायचे ठरवले आणि तो धावत नॉन स्ट्राइकर एंडकडे पोहोचला. पण श्रेत्ररक्षकाने नॉन स्ट्रइकर एंडला चेंडू न फेकता तो स्ट्राइकर एंडला फेकला आणि झालेल्या गोंधळामुळे विकेट कीपर पुन्हा स्ट्राइकर एंडला धावत आला. या सगळ्या गोंधळामध्ये दोन्ही फलंदाज नाबाद राहिले आणि स्टेडिअममध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर नेटकरी त्याची मजा लुटत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.