-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ बोर्डर – गावसकर मालिकेत १-२ असा पिछाडीवर पडलेला असताना, विराट आणि रोहित यांच्या फॉर्मची जशी चर्चा होतेय तशीच चर्चा होतेय ती गंभीरच्या संघ हाताळण्यातील त्रुटींची. भारतीय संघ सध्या स्थिंत्यतरातून जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ खेळाडूंसाठी पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि अशा काळात खेळाडूंना विश्वासात घेऊन संघात बदल केले जात नसल्याचं बोललं जात आहे. मैदानावरील खराब कामगिरीमुळे ड्रेसिंग रुममध्येही सगळं आलबेल नसल्याच्या बातम्या पसरत आहेत. (Gambhir on BCCI’s Radar)
गंभीर आणि संघातील काही खेळाडूंचं एकमेकांशी फारसं जमत नसल्याचं तसंच खेळाडूंमध्ये शास्त्री आणि द्रविड यांच्या काळात होता तसा संवाद नसल्याचा आरोपही होत आहे. रोहित शर्माने अलीकडेच पत्रकार परिषदेत आपण प्रत्येक खेळाडूशी संपर्क ठेवून आहोत. आणि संघातील बदलांविषयी त्यांच्याशी बोलतो, असं म्हटलं होतं. पण, वस्तुस्थिती ही आहे की, या मालिकेत रोहीतने संघातील बदलांविषयी खेळाडूंनाही अनभिज्ज ठेवलं होतं. (Gambhir on BCCI’s Radar)
(हेही वाचा- महाराष्ट्र बांगलादेशी अन् रोहिंग्यामुक्त करायचा आहे; Nitesh Rane)
गंभीर यांचं संघातील काही खेळाडूंशी जमत नसल्याचं बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्यानेच पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. संघातील ३ ते ४ खेळाडू गंभीरच्या वागणुकीवर खुश नाहीत. हे खेळाडू विराट, रोहित एवढे अनुभवी नाहीत. तर नितिश आणि हर्षित इतके नवीनही नाहीत, असं बोललं जात आहे. (Gambhir on BCCI’s Radar)
‘भारतीय संघाला आता एक कसोटी आणि त्यानंतर एकदिवसीय चॅम्पियन्स करंडक खेळायचा आहे. चॅम्पियन्स करंडकात कामगिरी चांगली झाली नाही तर गौतम गंभीरचं स्थानही डळमळीत होऊ शकतं,’ असं या पदाधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या बोलीवर पीटीआयला सांगितलं आहे. गंभीरचं निवड समिती सदस्यांशीही फारसं पटत नसल्याचं बोललं जात आहे. नितिश रेड्डीने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. पण, अंतिम अकरा जणांमध्ये वारंवार आणि बदल होणं खेळाडूंना रुचलेलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणही खराब झालं आहे. (Gambhir on BCCI’s Radar)
(हेही वाचा- old delhi railway station : जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनबद्दल या खास गोष्टी माहिती आहेत का?)
बीसीसीआयचे आधीचे सचिव जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर सचिवांची जागा रिकामी आहे. १२ जानेवारीला ती जागा भरल्यावर भारतीय संघाविषयी काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. ‘मूळात गौतम गंभीर हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली पसंती नव्हताच. व्ही. व्ही. एस लक्ष्मणने या जबाबदारीसाठी नाही म्हटलं. आणि काही परदेशी खेळाडू तीनही प्रकारात मार्गदर्शन करायला तयार नव्हते. त्यामुळे तडजोड म्हणून गंभीरची निवड झाली,’ असं खळबळजनक वक्तव्य या पदाधिकाऱ्याने केलं आहे. (Gambhir on BCCI’s Radar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community