- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगवर निशाणा साधला होता. ‘विराट आणि रोहितच्या फॉर्मशी पाँटिंगचा काहीही संबंध नाही. त्याने आपलं पाहावं,’ असं गंभीरने पाँटिंगला सुनावलं होतं. या तिखट बोलण्याला पाँटिंगनेही आता उत्तर दिलं आहे. ‘अशा बोचऱ्या माणसाकडून मला हेच उत्तर अपेक्षित होतं,’ असं आता पाँटिंगने म्हटलं आहे. (Gambhir vs Ponting)
थोडक्यात ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी एक शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियातील एका वाहिनीशी बोलताना पाँटिंगने म्हटलं आहे की, ‘आधी मला ती प्रतिक्रिया ऐकून आश्चर्य वाटलं. पण, मग ती प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षकांची आहे कळल्यावर काही वाटलं नाही. मी गंभीरला ओळखतो. तो बोचरं बोलणाराच माणूस आहे,’ असं पाँटिंगने म्हटलं आहे. (Gambhir vs Ponting)
(हेही वाचा – IPL 2025 : मुनाफ पटेल दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक)
Ricky Ponting has stood by his comments about Virat Kohli that lit the fuse for an explosive Indian summer. The former Aussie captain’s concerns about King Kohli’s recent test record were met with a stinging response from India’s combative coach Gautam Gambhir. #7NEWS pic.twitter.com/vzBrRcbcXo
— 7NEWS Brisbane (@7NewsBrisbane) November 12, 2024
त्यानंतर पाँटिंगने कोहलीच्या फॉर्मबद्गलचं आपलं मतंही सांगितलं. ‘कोहलीला कमी लेखण्याचा माझा विचार नव्हताच. मी असंही मुलाखतीत बोललो आहे की, त्याचा ऑस्ट्रेलियातील पूर्वीचा फॉर्म बघता, तो आताही चांगली कामगिरी करू शकतो. आणि ही मालिका त्याला फॉर्म गवसण्यासाठी उपयोगी पडू शकते.’ (Gambhir vs Ponting)
पाँटिंगने नंतर नरमाईची भूमिका घेतली असली तरी गंभीर आणि पाँटिंगचा पूर्वेतिहास काही फारसा चांगला नाही. या आधीच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्लेजिंग आणि परस्पर टीका करणाऱ्या वक्तव्यांमुळे दोघं गाजले होते. दुसरीकडे भारतात गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदांमध्ये आक्रमक बाणा दाखवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. माजी कसोटीपटू संजय मांजरेकरने गंभीरला पत्रकार परिषदेसाठी पाठवू नका अशी थेट टीका केली होती. (Gambhir vs Ponting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community