- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड जाहीर केली आणि त्यानंतर गंभीरवर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला अलीकडेच मिळालेल्या विश्वविजयानंतर ही बातमी आली आहे. आणि गंभीरवर या विजयाची उंची कायम ठेवण्याची जबाबदारी इथून पुढे असेल. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?)
४२ वर्षीय गौतम गंभीर (Gautam Gambhir) २००३ मध्ये भारतीय संघात आला. आणि तिथून पुढे १३ वर्षं त्याने भारतीय संघात सलामीवीर म्हणून भूमिका निभावली. तीनही प्रकारात मिळून त्याने १०,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या. २०११ मध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदात गंभीरचा वाटा मोलाचा होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघालाही त्याने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं होतं. (Gautam Gambhir)
सचिव जय शाह (Jay Shah) यांनी गंभीरची नियुक्ती जाहीर करताना त्याच्या कौशल्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
‘आधुनिक क्रिकेट वेगाने बदलतंय. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) हे बदल जवळून बघितले किंवा अनुभवले आहेत. आपलं कौशल्य वेगवेगळ्या जबाबदारी निभावताना सिद्ध केलं आहे. भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच्यासारखी योग्य व्यक्ती नाही, असा मला विश्वास आहे,’ असं जय शाह यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे.
(हेही वाचा- ‘Ladki Bahin Yojana’ योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक; वाचा तुम्ही अर्ज करू शकता कि नाही ?)
जय शाह यांच्या या संदेशानंतर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble), अजय जडेजा (Ajay Jadeja), रॉबिन उथप्पा (Robin Uthappa), हरभजनसिंग (Harbhajan Singh) यांनीही गंभीरला शुभेच्छा दिल्या आहेत. (Gautam Gambhir)
.@GautamGambhir Congratulations and best wishes Gauti bhai! https://t.co/mUGphXRNt8
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) July 9, 2024
Congratulations @GautamGambhir. Wishing you lots of success in this role. God bless🤗 https://t.co/UnpZiQdGSh
— VVS Laxman (@VVSLaxman281) July 9, 2024
Congratulations @GautamGambhir for your new innings as Head Coach of Indian Cricket Team. I am sure that your experience, energy, passion, aggression and talent will steer the team on the path of excellence. My best wishes to you. Good luck buddy pic.twitter.com/9gVruBZPC4
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 9, 2024
Congratulations @GautamGambhir bro!! Can’t wait to see the men’s team flourish under your able guidance. Wishing you the best for the new role. Lots of love!! https://t.co/Ys9HritXSN
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) July 9, 2024
Welcome to the new era of Indian Cricket 🇮🇳 Gautam Gambhir is now the new head coach of Team India 👏
Many Congratulations to @GautamGambhir , Team India will reach new heights under GG 💥#GautamGambhir pic.twitter.com/5Mv7Y6jiNd
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) July 9, 2024
Congratulations @GautamGambhir. Wishing you the best! https://t.co/abQ2GST5kI
— Anil Kumble (@anilkumble1074) July 9, 2024
आता गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) सपोर्ट स्टाफ कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. गौतमला कोलकाता संघातील प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar) भारतीय संघाबरोबरही हवा असल्याची चर्चा आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community