-
ऋजुता लुकतुके
भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक म्हणून कसोटी लागणार आहे. आणि प्रशिक्षक म्हणून तो आक्रमक व्यूहरचना आखतो की, नेमकी काय भूमिका घेतो यावर सगळ्यांचं लक्ष असेल. गंभीरच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीवर सगळीकडे उलटसुलट चर्चाही सुरू आहे. त्यातच आता श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू थिसारा परेरा (Thisara Perera) गंभीरच्या बाजूने उभा राहिला आहे. ‘२०११ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात मी त्याला बाद केलं आहे. पण, त्याची आक्रमकता मी ओळखून आहे. मैदानात तो राजा असतो. प्रशिक्षक असाच असावा असं मला वाटतं,’ असं थिसारा म्हणतो.
(हेही वाचा- Government Residence : तब्बल २०० पेक्षा अधिक माजी खासदारांनी अद्याप सोडले नाही शासकीय निवासस्थान)
‘यावर्षी आयपीएलमध्येही मी त्याला पाहिलं आहे. त्याने संघाला चांगलं मार्गदर्शन केलं. कधी कधी तो आक्रमक दिसतो. त्याची देहबोलीही तशीच आहे. पण, तुम्ही तसे नसाल तर तुमचं संघावर नियंत्रण कसं राहणार?’ असा प्रश्नच थिसाराने विचारला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील थिसारा परेराने गंभीरच्या निवडीची पाठराखण केली आहे. (Gautam Gambhir)
“He’s always been a fierce competitor”, #AngeloMathews and #ThisaraPerera share their thoughts about the new Head Coach of #TeamIndia, #GautamGambhir 👀#Cricket pic.twitter.com/PZuPKurbbZ
— Star Sports (@StarSportsIndia) July 17, 2024
गंभीर मनाला येईल ते बोलणारा आहे. तसंच त्याची शैलीही आक्रमक आहे. त्यामुळे संघातील खासकरून ज्येष्ठ खेळाडूंशी तो कसं जुळवून घेतो यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे गंभीर राहुल द्रविड़च्या (Rahul Dravid) जागी प्रशिक्षक म्हणून आला आहे. द्रविडच्या मितभाषी आणि सौम्य वागणुकीच्या तुलनेत गंभीरचं वागणं अगदी विरुद्ध बाजूचं आहे. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद; उबाठाचे धाबे दणाणले; अपप्रचार सुरू)
त्यामुळे गंभीरची नियुक्ती झाल्यापासून त्यावर चर्चा सुरू आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून (Sri Lanka tours) गंभीर पदभार स्वीकारेल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. पण, ज्येष्ठ खेळाडू श्रीलंकेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community