Gautam Gambhir : टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकातील गौतम गंभीर समोरची येत्या दोन वर्षांतील आव्हानं

गंभीर यांचा प्रोबेशनचा काळ आता संपला आहे.

40
Gautam Gambhir : गौतम गंभीर समोरची येत्या दोन वर्षांतील आव्हानं, टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक
Gautam Gambhir : गौतम गंभीर समोरची येत्या दोन वर्षांतील आव्हानं, टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मागच्या नऊ महिन्यांत खूप मोठी रोलर-कोस्टर राईड पाहिली आहे. सहा कसोटी पराभव पचवले आहेत. तर आता चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) विजेतेपद पटकावलं आहे. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीला प्रोबेशन म्हटलं जातं. गंभीरचा तो कालावधी आता संपला आहे. येणाऱ्या दिवसांत गंभीरला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. यातील एक आहे रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतरचा नवीन कर्णधार शोधणं. आणि इतर गोष्टी आहेत त्या २०२६ चा टी-२० विश्वचषक आणि २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक. यातील टी-२० प्रकारात भारतीय संघाचा चांगलाच जम बसला आहे. पण, एकदिवसीय संघात ज्येष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीमुळे काही प्रश्न कठीण होणार आहेत.

चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) भारतीय संघाच्या विजयामुळे सध्या गौतम गंभीरला (Gautam Gambhir) नक्कीच थोडा दिलासा मिळाला असणार. पण, आता जूनमधील इंग्लंड दौऱ्यानंतर त्याची खरी परीक्षा होणार आहे.

(हेही वाचा – Ukraine Ready For Ceasefire : युक्रेन-रशियामध्ये आता महिन्याभराकरता युद्धबंदी लागू !)

२०२६ च्या भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ गतविजेता असेल. आणि संघासमोर आव्हान असेल विजेतेपद राखण्याचं. हा एक प्रकार आहे जिथे भारतीय संघाला जून २०२४ मधील विजयानंतर कुठलीच अडचण किंवा अडथळे आलेले नाहीत. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जाडेजा विश्वचषक विजयानंतर निवृत्त झाले. पण, युवा खेळाडू त्यांची जागा घेण्यासाठी सज्ज होते. या प्रकारात अभिषेक वर्माचा सलामीवीर म्हणून शोध गंभीरने लावलाय. आणि वरुण चक्रवर्तीला संधीही त्यानेच दिलीय. संजू सॅमसन, अभिषेक वर्मा, यशस्वी जयसवाल, कर्णधार सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती जेव्हा एका संघात खेळतील, तेव्हा या संघाला हरवणं अजिबात सोपं असणार नाही.

पण, एकदिवसीय आणि कसोटी या इतर दोन्ही क्रिकेटच्या प्रकारात गौतम गंभीरला (Gautam Gambhir) संघावर मेहनत घ्यावी लागणार आहे.

(हेही वाचा – Bangladesh Unrest : शेख हसीनांसह कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित आणि विराटने सध्या निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पण, विराट निदान २०२७ पर्यंत खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याची तंदुरुस्ती आणि सातत्य यात तो कमी पडत नाहीए. पण, रोहित शर्माविषयी (Rohit Sharma) गंभीरला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, रोहित २०२७ पर्यंत संघात राहू शकेल का? आणि राहणार नसेल तर त्याला संघहिताच्या भावनेतून आधीच संघातून दूर करावं लागणार का, याचा विचार गंभीरला (Gautam Gambhir) करावा लागेल. त्यासाठी बीसीसीआय (BCCI) आणि निवड समिती अशा दोघांना मध्ये घेऊन ही योजना गंभीरला तयार करावी लागणार आहे.

कसोटी संघ निवडतानाही गंभीरची (Gautam Gambhir) दमछाक होणार आहे. कारण, इथे पुन्हा प्रश्न रोहित शर्माचाच (Rohit Sharma) आहे. रोहितने खेळायचं ठरवल्यास, यशस्वी आणि के एल राहुल हे आणखी दोन पर्याय सलामीसाठी भारतीय संघाकडे आहेत. आणि अशा परिस्थितीत शुभमन गिलला (Shubman Gill) संघात जागा राहणार नाही. त्यामुळे कसोटी संघाचा समतोल राखणं हे गंभीर समोरचं पहिलं आव्हान आहे. कारण, आयपीएल संपल्या संपल्या सगळ्यात आधी भारताचा इंग्लंड दौराच असणार आहे. आणि यात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे.

शिवाय रोहित (Rohit Sharma) खेळणार असला किंवा नसला तरी त्याचा कर्णधार म्हणून उत्तराधिकारी कोण हे गंभीरला पाहावंच लागणार आहे. तर इंग्लंड दौऱ्यापर्यंत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या उपलब्धतेवर स्पष्टताही गंभीरला (Gautam Gambhir) लागेल. आणि मधल्या फळीत जी एक जागा रिकामी आहे, ती कुणाला मिळणार? श्रेयस अय्यरचा कसोटीसाठीही विचार होणार का, हा प्रश्नही गंभीरला (Gautam Gambhir) सोडवावा लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.