Gautam Gambhir : ‘बस्स! आता खूप झालं,’ गौतम गंभीरचा भारतीय खेळाडूंना सज्जड दम 

Gautam Gambhir : मेलबर्नमधील पराभव भारतीय संघाला जिव्हारी लागला आहे

71
Gautam Gambhir : ‘बस्स! आता खूप झालं,’ गौतम गंभीरचा भारतीय खेळाडूंना सज्जड दम 
Gautam Gambhir : ‘बस्स! आता खूप झालं,’ गौतम गंभीरचा भारतीय खेळाडूंना सज्जड दम 
  • ऋजुता लुकतुके

मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील बेबनावही समोर आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आणि उर्वरित सिडनी कसोटी भारतीय संघाने जिंकली नाही तर बोर्डर – गावसकर चषक कर संघ गमावेलच, शिवाय आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतूनही बाहेर पडेल. त्यामुळे भारतीय संघावर सध्या विजयाचं दडपण आहे. त्यातच मैदानावर आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी चांगली होत नाही. आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला इतरांची साथ मिळत नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंवर वैतागले आहेत. (Gautam Gambhir)

(हेही वाचा- नववर्षानिमित्त Raj Thackeray यांचा मनसैनिकांसाठी खास संदेश; म्हणाले, “निवडणुकीत जे घडलं ते…”)

चौथ्या कसोटीत संघ प्रशासनाने आखून दिलेल्या रणनीतीचं पालन न केलेल्या खेळाडूंवर गंभीर नाराज असल्याचं दिसतंय. पराभवानंतर त्याने ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंची एक बैठक बोलावली. आणि यात कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी ‘सांगितलेल्या गोष्टींचं पालन न करता मनमनी करणाऱ्या खेळाडूंना आता खपवून घेणार नाही,’ असा सज्जड इशाराच गंभीरने दिल्याचं समजतंय. इंडियन एक्स्प्रेसने अशा प्रकारची बातमी केली आहे. (Gautam Gambhir)

‘मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने खेळण्यासाठी ६ महिने दिले. आता मी सांगतो तसे मैदानावर वागला नाहीत, तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्यात येईल,’ असं गंभीरने खेळाडूंना सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे. (Gautam Gambhir)

(हेही वाचा- Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बुमराह, नितीशचं नाव इतिहासात कोरलं गेलं तो क्षण )

सध्या भारतीय संघात दोन तट पडल्याचंही बोललं जात आहे. आणि ड्रेसिंग रुममध्ये ठरलेल्या गोष्टी मैदानात पडलेल्या दिसत नाहीत. मेलबर्नमध्ये पाचव्या दिवशी भारताला निदान कसोटी अनिर्णित राखण्याची पुरेपूर संधी होती. पण, ३ बाद १२१ वरून भारतीय संघ पुढील २२ षटकांत १५५ धावांवर सर्वबाद झाला. (Gautam Gambhir)

रिषभ पंतने जम बसलेला असताना लाँग ऑनला षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. तर विराट कोहली भोजना आधीच्या शेवटच्या षटकात आठव्या यष्टीजवळचा चेंडू खेळताना बाद झाला. रोहितने काही चेंडू तग धरला. पण, अखेर फटकेबाजीचा मोह त्यालाही आवरला नाही. आणि तो ही झटपट बाद झाला. फलंदाजांचं अपयश संघावर आणि खासकरून गोलंदाजांवर अतिरिक्त ताण आणत आहे. तर गोलंदाजीतही जसप्रीत बुमराहला सिराज आणि आकाशदीप यांची म्हणावी तशी साथ मिळताना दिसत नाही. आकाशदीपची गोलंदाजी चांगली होतेय. पण, त्याला बळी मिळत नाही. तर सिराजच्या कामगिरीत सातत्य नाही. (Gautam Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.