- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेर नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मंगळवारी उशिरा गंभीरच्या नावाची घोषणा केली आहे. अलीकडे टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला यश मिळवून दिलेले राहुल शर्मा (Rahul Sharma) स्पर्धेनंतर पदावरून पायउतार झाले आहेत. तर गंभीरची प्रशिक्षक म्हणून पहिली मोहीम असेल ती श्रीलंका दौरा. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Up Accident: उत्तर प्रदेशात भीषण अपघात! दुधाच्या कंटेनरला बसची धडक, १८ प्रवाशांचा मृत्यू)
२७ जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरू होत आहे आणि या दौऱ्यात संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी प्रशिक्षकपद सोडण्याची तयारी दाखवली होती. पण, बीसीसीआयने द्रविड आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांचं मन वळवलं. द्रविड टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर कायम राहायला तयार झाले. हा विश्वचषक भारताने जिंकल्यामुळे द्रविड यांच्या कारकीर्दीचा शेवटही उंचीवर झाला. (Gautam Gambhir)
विश्वचषक सुरू असताना भारतात मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती सुरू होत्या. अंतिम टप्प्यात नवीन नावाची घोषणाही अपेक्षित होती. ती अखेर झालीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्विटरवरून गंभीरच्या नावाची घोषणा केली. (Gautam Gambhir)
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
‘भारताचा माजी डावखुरा सलामीवीर अनुभवी आहे. क्रिकेट खेळाची खूप चांगली जाण त्याला आहे. आपली फलंदाजी आणि व्यूहरचना आखण्याची हातोटी यामुळे भारतीय क्रिकेटवर त्याने आपला ठसा उमटवला आहे. भारतीय क्रिकेटमधील ते महत्त्वाचं नाव आहे,’ असं बीसीसीआयने गौतम गंभीरबद्दल आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Samriddhi Highway वरील दोन लाख झाडे जगवणार रस्त्यावर पडलेले पावसाचे पाणी; काय आहे योजना ?)
गंभीरच्या नावाची घोषणा करताना बीसीसीआयने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्याच्या सपोर्ट स्टाफचे आभार मानले आहेत. तर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) नावाची घोषणा झाल्यावर ट्विटवर आनंद व्यक्त केला आहे.
India is my identity and serving my country has been the greatest privilege of my life. I’m honoured to be back, albeit wearing a different hat. But my goal is the same as it has always been, to make every Indian proud. The men in blue shoulder the dreams of 1.4 billion Indians… pic.twitter.com/N5YyyrhXAI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
‘मी देशाचं प्रतिनिधित्व करू शकलो हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. माझा देशच माझी ओळख आहे. भारतीय संघाबरोबर पुन्हा जोडलं जाण्याचा आनंद मला वाटतो. यावेळी जबाबदारी मात्र वेगळी आहे. पण, माझं उद्दिष्टं तेव्हा आणि आताही एकच आहे. १.४ अब्ज लोकांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करून दाखवायची आहे,’ असं गौतम गंभीरने ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?)
राहुल द्रविडच्या कार्यकाळात मागच्या अडीच वर्षांत भारतीय संघाने टी-२०, एकदिवसीय आणि कसोटीमध्येही आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठला. आता गौतम गंभीरला कामगिरीत सातत्य ठेवायचं आहे. चॅम्पियन्स करंडक तसंच कसोटी अजिंक्यपदापर्यंत भारतीय संघाला पोहोचवायचंय. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community