Gautam Gambhir : माजी खेळाडूंनी केलं गंभीरच्या नियुक्तीचं स्वागत 

Gautam Gambhir : तर बीसीसीआयने गंभीरच्या नियुक्तीपूर्वी विराटशी चर्चा केली नसल्याचं समोर आलं आहे 

225
Gautam Gambhir : माजी खेळाडूंनी केलं गंभीरच्या नियुक्तीचं स्वागत 
Gautam Gambhir : माजी खेळाडूंनी केलं गंभीरच्या नियुक्तीचं स्वागत 
  • ऋजुता लुकतुके 

गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदी झालेल्या नियुक्तीचं भारतातच नाही तर जगभरातील माजी खेळाडूंनी स्वागत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn), अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) या तिघांनाही गंभीरच्या नियुक्तीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. डेल स्टेन (Dale Steyn) यांनी गंभीरची मैदानावरील आक्रमकता आणि मैदानाबाहेरील शांत वागणं याची आठवण जागवली.  (Gautam Gambhir)

(हेही वाचा- PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच लष्करातील जवानाचा बनाव उघड!)

‘गंभीर एक हुशार क्रिकेटपटू आहे. त्याने हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. अशा खेळाडूने प्रशिक्षणाकडे वळणं हा क्रिकेटचा फायदा आहे. तो संघासाठी चांगलं योगदान देऊ शकतो. त्याच्याकडून तरुण खेळाडूंनी खूप काही शिकण्यासारखं आहे. शिवाय गंभीरसारख्या आक्रमक खेळाडूंचा फायदा फक्त भारतालाच नाही तर जागतिक क्रिकेटलाही होईल,’ असं डेल स्टेनने बोलून दाखवलं आहे. (Gautam Gambhir)

तर जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनीही गंभीर सकारात्मक विचार करणारा आणि सडेतोड खेळाडू असल्याचं मत व्यक्त केलं आहे. (Gautam Gambhir)

दरम्यान, गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) काही खेळाडूंबरोबर असलेले जुने वाद हा एक चिंतेचा विषय आहे. अगदी अलीकडे आयपीएल दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीशीही त्याचा वाद झाला होता. त्यानंतर बंगळुरू आणि कोलकाता संघाचा सामना असताना दोघं हस्तांदोलन करत एकमेकांना मिठी मारतानाही दिसले. त्यामुळे दोघांनी आपापसातील वाद मिटवलेलाही असू शकतो. पण, विशेष म्हणजे गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करताना बीसीसीआयने विराट कोहलीशी चर्चा केली नव्हती, असं समोर आलं आहे.

गौतम गंभीरची (Gautam Gambhir) निवड बीसीसीआयच्या क्रिकेटविषयक समितीने केली. या समितीत जतीन परांजपे, अशोक मल्होत्रा (Ashok Malhotra) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) हे माजी खेळाडू आहेत. या तिघांच्या समितीने गंभीरची निवड करताना काही खेळाडूंशी चर्चा केली होती. यात रोहितनंतर टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करू शकेल अशा हार्दिक पांड्याचाही समावेश होता. पण. विराटशी चर्चा करण्यात आली नव्हती, असं आता समजतंय.  (Gautam Gambhir)

(हेही वाचा- “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…” Raosaheb Danve काय म्हणाले?)

‘बीसीसीआयने एका खेळाडूबरोबरचे संबंध न पाहता, संघहिताला प्राधान्य दिलं आहे. गंभीर संघाला अधिक आक्रमक आणि वेगवान बनवेल, अशी बीसीसीआयला आशा आहे. शिवाय स्थिंत्यतरातून जात असलेल्या भारतीय संघाला तो चांगला आकार देईल, अशीही अपेक्षा त्याच्याकडून आहे,‘ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं. (Gautam Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.