Gautam Gambhir : गंभीर, आगरकरच्या राज्यांत खेळाडूंना मालिकांची निवड करता येणार नाही

व्यस्त कार्यक्रम हाताळण्यासाठी खेळाडूंना विश्रांती मिळेल. पण, विश्रांतीचा अधिकार खेळाडूंचा नाही.

158
Gautam Gambhir Press Conference : रोहित शर्माची अनुपस्थिती, राहुल-रोहित-विराटचा फॉर्म यावर गौतम गंभीर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ निघण्यापूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी खेळाडूंना जाहीरपणे एक इशारा दिला आहे. ‘व्यस्त कार्यक्रमाशी जुळवून घेण्यासाठी विश्रांती गरजेची आहे. पण, कधी विश्रांती घ्यायची हे खेळाडू ठरवू शकणार नाहीत,’ असा सज्जड दमच दोघांनी पत्रकार परिषदेत दिला.

या मुद्यावर आगरकर आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) एकत्रपणे बोलले. भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम आणि त्यामुळे खेळाडूंना असलेली विश्रांतीची गरज यावर अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. पण, दोघांनी ते व्यवस्थित हाताळले. ‘मी हे आधीच सांगितलं आहे. वेळापत्रक व्यवस्थापनाचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. उदा. बुमराहला कधी विश्रांती द्यायची हे ठरवावंच लागेल. पण, एखादा फलंदाज फॉर्ममध्ये असेल तर त्याला सुट्टी देईन चालणार नाही. त्यामुळे खेळाडूप्रमाणे हे निकष बदलतील. आणि निर्णय हा प्रशासनाच्या हातात असेल,’ असं गंभीर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. (Gautam Gambhir)

(हेही वाचा – Budget 2024 : विरोधकांच्या बेरोजगारीच्या आरोपाला अर्थसंकल्पातून प्रत्युत्तर; नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद)

रोहित आणि विराट यांनी टी-२० विश्वचषकानंतर या प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. आणि श्रीलंका दौऱ्यातही ते विश्रांती घेतील असं बोललं जात होतं. पण, यावर गंभीरने आपली भूमिका मांडली. ‘इथून पुढे रोहित आणि विराट दोनच प्रकार खेळणार आहेत. अशावेळी ते जास्तीत जास्त सामन्यांसाठी उपलब्ध राहिले पाहिजेत,’ असं रोखठोक उत्तर गंभीरने दिलं.

आगरकर यांनीही गंभीरचाच मुद्दा उचलून धरला. ‘स्टार खेळाडूंनाही मालिका निवडीचे अधिकार नाहीत. संघ प्रशासनाला ज्या खेळाडूंनी खेळावं असं वाटत असेल तेव्हा तेव्हा खेळाडू उपलब्ध झाले पाहिजेत. अर्थात, त्यांच्याही विश्रांतीची काळजी घेतली गेली पाहिजे. तेव्हा हे समन्वयानेच होईल,’ असं आगरकर यांनी सांगितलं.

तर रवींद्र जाडेजाला एकदिवसीय मालिकेतून वगळलेलं नाही. तो अजूनही या प्रकारात भारताकडून खेळू शकतो, असंही दोघांनी निक्षून सांगितलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.