- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकातील विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांचेही हौसले बुलंद आहेत. अशावेळी गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाची सूत्र हातात घेत आहे. ४२ वर्षीय गंभीरच्या नावावर १०,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तसंच २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारताने जिंकला त्यात गंभीरचं योगदान मोठं होतं. तर गेल्याच वर्षी त्याने कोलकाता संघाला मार्गदर्शक म्हणून आयपीएल विजेतेपदही मिळवून दिलं आहे. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Nagpur Crime News : धक्कादायक! नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला)
श्रीलंकेत भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने गौतम गंभीरचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि यात गंभीर संतुलित संघाविषयी बोलत आहे. गंभीरबरोबर या चर्चेत कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth), इरफान पठान (Irfan Pathan) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यांनीही भाग घेतला. (Gautam Gambhir)
संघातील संतुलनाविषयी बोलताना गंभीर म्हणतो, ‘एकदिवसीय क्रिकेट बदललंय. तुम्हाला आता खेळाडू ओळखून त्यांच्याकडून हवंतसं काम करून घ्यावं लागेल. बेडर आणि परिस्थिती प्रमाणे तंत्र बदलतील, असे फलंदाज हवेत. हल्ली दोन नवीन चेंडू असल्याने रिव्हर्स स्विंग मिळत नाही. मनगटी फिरकी गोलंदाजही पहिल्यासारखे उपयुक्त ठरत नाहीत. हे सगळं बघून आता रणनीती आखावी लागेल.’ (Gautam Gambhir)
Why is it important to have a balanced mix of players in a team?
How have rule changes affected selection?📹 | Watch Team India Head Coach, @GautamGambhir, discuss team formation, new approaches, and player identification.#MenInBlue #Cricket pic.twitter.com/bMoiJf08Cm
— Star Sports (@StarSportsIndia) July 16, 2024
२०१३ नंतर भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे गंभीरसमोरचं पहिलं मोठं आव्हान असेल ते २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाचं. आणि त्यानंतर कसोटी अजिंक्यपद हे दुसरं आव्हान असेल. गंभीर खेळत असताना त्याने सलग ५ कसोटी सामन्यांत शतकं झळकावली होती. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Mohammed Shami : दुखापतीनंतर मोहम्मद शमी नेट्समध्ये परतला)
या कामगिरीमुळे गंभीर डॉन ब्रॅडमन, जॅक कॅलिस आणि मोहम्मद यूसुफ यांच्या पंक्तीत बसला आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community