Gautam Gambhir : पहिल्याच मालिकेनंतर गौतम गंभीरवर होणारी टीका योग्य आहे का?

न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका गंभीरची प्रशिक्षक म्हणून दुसरी मालिका होती.

62
Gautam Gambhir Press Conference : रोहित शर्माची अनुपस्थिती, राहुल-रोहित-विराटचा फॉर्म यावर गौतम गंभीर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ चांगलाच बॅकफूटवर गेला आहे. आणि संघाच्या रणनीतीवर चौफेर टीका होत आहे. खेळपट्ट्या फिरकीला धार्जिण्या का बनवल्या, प्रमुख खेळाडू का फ्लॉप ठरले? संघात केलेले बदल नेमके कशामुळे केले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आणि त्यांचा रोख हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरच (Gautam Gambhir) आहे. पण, गंभीर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून ही फक्त दुसरी मालिका होती. यापूर्वी बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाने २-० असा विजय मिळवला होता. अशावेळी ५ कसोटींनंतर प्रशिक्षकावर टीका करणं कितपत योग्य आहे?

गंभीर यांनी कारभार हातात घेतला तेव्हा भारतीय संघ टी-२० विश्वचषक जिंकलेला होता. एकदिवसीय विश्वचषकात संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आणि कसोटी क्रमवारीत संघ अव्वल स्थानावर होता. या स्थानावर आधीचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघाला पोहोचवलं. तर त्या आधीचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी परदेशात जिंकण्याची ईर्ष्या भारतीय खेळाडूंमध्ये निर्माण केली. या अजोड कामगिरीनंतर संघातील विराट, रोहित, अश्विन आणि जाडेजा हे खेळाडू आता ३५ पार केलेले आहेत. आणखी एक – दोन वर्षांनी सगळे एकत्र संघात नसतील. त्यांना पर्यायी खेळाडू निवडावे लागतील. आणि संघाची घडी नव्याने बसवावी लागेल.

अशा परिस्थितीत गंभीर यांनी संघाची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. सुरुवातीला त्यांच्या आधीचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची ५ कसोटींनंतरची कामगिरी पाहूया,

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माला कोणती गोष्ट निवड समितीने सांगावी असं गावसकरांना वाटतं?)

गौतम गंभीर

WhatsApp Image 2024 11 05 at 12.28.49 PM

बांगलादेश विरुद्ध २ कसोटी घरच्या मैदानावर – २-० विजय
न्यूझीलंड विरुद्ध ३ कसोटी घरच्या मैदानावर – ०-३ पराभव
राहुल द्रविड

WhatsApp Image 2024 11 05 at 12.30.41 PM

न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटी घरच्या मैदानावर – १-० विजय
द आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी परदेशात – १-२ पराभव
श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी मायदेशात – २-० विजय
रवी शास्त्री

WhatsApp Image 2024 11 05 at 12.31.16 PM

श्रीलंके विरुद्ध ३ कसोटी परदेशात – ३-० विजय
श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी मायदेशात – १-० विजय

गौतम गंभीर (Gautam Gambhir)  समोरचं पुढील मोठं आव्हान हे ऑस्ट्रेलिया दौरा तसंच चॅम्पियन्स करंडक आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद हे आहे. त्यासाठी संघाची घडी नीट बसवणं हे आता आव्हान असणार आहे. पहिल्या दोन प्रशिक्षकांच्या तुलनेत गंभीरने केलेला एकमेव बदल आहे तो खेळपट्टीचा. त्याने मायदेशातील मालिकांसाठी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवण्याची सूचना स्थानिक क्रिकेट मंडळं आणि क्युरेटरना दिली होती. तर आधीच्या दोन्ही प्रशिक्षकांनी या उलट धोरण ठेवून देशातही खेळपट्टी निदान पहिल्या दिवशी थोडीफार उसळी आणि स्विंग देणारी असेल असं पाहिलं. आता गंभीरला आपल्या काही धोरणांचा पुनर्विचार करावा लागणार एवढं नक्की आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.