Gautam Gambhir : गंभीरच्या पसंतीच्या सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयची फुली?

Gautam Gambhir : गंभीरने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुचवलेली नावं बीसीसीआयने नाकारल्याचं समजतंय. 

175
Gautam Gambhir : ‘आक्रमकपणा नसेल तर संघाला नियंत्रित करू शकत नाही…’ - थिसारा परेरा 
Gautam Gambhir : ‘आक्रमकपणा नसेल तर संघाला नियंत्रित करू शकत नाही…’ - थिसारा परेरा 
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अजून भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम सुरू केलेलं नाही. पण, त्या आधीच त्याला एक छोटासा धक्का बसला आहे. जाँटी ऱ्होड्सला क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक नेमण्याची गंभीरने केलेली शिफारस बीसीसीआयने फेटाळली असल्याचं समजतंय. ऱ्होड्स हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. गंभीर आणि ऱ्होड्स यांनी आयपीएलच्या लखनौ सुपरजायंट्स संघात एकत्र काम केलं आहे. तेव्हा गंभीर संघाचा मार्गदर्शक होता. (Gautam Gambhir)

पण, बीसीसीआयला शक्यतो सहाय्यक प्रशिक्षक हे भारतीय हवे आहेत. मागची ७ वर्षं हा अघोषित नियम त्यांनी पाळला आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी परदेशी नावं टाळली आहेत. अशावेळी गंभीरचा जाँटी ऱ्होड्स आणि रायन टेन डयुसकाटे असे दोन पर्याय बंद झाले आहेत. (Gautam Gambhir)

(हेही वाचा – Jammu-Kashmir संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची ताकद वाढणार)

या नावांची चर्चा 

इतकंच नाही तर गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून गंभीरने (Gautam Gambhir) आर विनय कुमारचं नाव सुचवलं होतं. ते ही बीसीसीआयने स्वीकारलेलं नाही. त्यासाठी झहीर खान तसंच एल बालाजी यांच्या नावाची चर्चा आहे. सहाय्यक प्रशिक्षक नेमण्याचा अंतिम अधिकार बीसीसीआयकडे राहील, हे आधीच त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Gautam Gambhir)

या आधीचे दोन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांना सहाय्यक प्रशिक्षक निवडताना बीसीसीआयच्या निर्णयात फारशी ढवळा ढवळ केली नव्हती. शास्त्री यांच्या काळातील प्रशिक्षकांची फळीच द्रविड यांनी कायम ठेवली होती. क्रिकेट समितीच्या शिफारशीवरून प्रशिक्षकांचं नाव बीसीसीआय (BCCI) निश्चित करत असतं. मुख्य प्रशिक्षकाचं मत आणि सूचनाही त्यासाठी लक्षात घेतल्या जातात. सहाय्यक प्रशिक्षकांच्या मुलाखतींनाही मुख्य प्रशिक्षक हजर असतो. (Gautam Gambhir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.