-
ऋजुता लुकतुके
दिल्ली प्रिमिअर लीग सुरू असताना आयोजकांनी सोशल मीडियावर एक मजेशीर सेगमेंट ठेवला होता. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबरच्या (Gautam Gambhir) या छोट्या सत्रात गंभीरला एक मजेशीर काम सोपवण्यात आलं होतं. बॉलिमूडमधील प्रसिद्ध नावं भारतीय क्रिकेटपटूंना द्यायची. गंभीरनेही हे काम आवडीने केलं. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) त्याने शेहनशाह हा अमिताभचा सिनेमा निवडला. तर युवराजसाठी बादशाह. सगळ्यांना तेव्हा हसू आलं, जेव्हा स्वत:ला तो अँग्री यंग मॅन म्हणाला.
(हेही वाचा- Bhandara Flood : जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रील बनवण्यात व्यस्त)
सचिन तेंडुलकरसाठी त्याने सलमानचा दबंग निवडला. जसप्रीत बुमराला तो खिलाडी म्हणाला. पण, त्याचवेळी त्याने हे ही स्पष्ट केलं की, संघात खिलाडी किती आवश्यक आहे. इतरांपेक्षा या खिलाडीचं महत्त्व मोठं असल्याचं सांगायला तो विसरला नाही. राहुल द्रविडसाठी गंभीरने नवीन सिनेमाच जाहीर केला. राहुल द्रविडला (Rahul Dravid) तो ‘मि परफेक्शनिस्ट’ म्हणाला. (Gautam Gambhir)
Gautam Gambhir said – “Virat Kohli is the ‘ Shahenshah’ of Cricket”
Need new haters , old one become fan 👑
Video credit :- shefali bagga (Instagram) pic.twitter.com/ciILszbOzI
— ՏᎥ₫ 𝕩 (@_bad_boy17) September 11, 2024
महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची नावं मात्र आश्चर्यकारकरित्या या मजेशीर खेळात नव्हती. गौतम गंभीरने भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेताना विराट बरोबरच्या आपल्या संबंधांवर एकदा उघड भाष्य केलं होतं. गेल्यावर्षी आयपीएल दरम्यान दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. पण, अलीकडे दोघांनी आपल्यातील मतभेद मिटवलेले दिसत आहेत. ‘आम्हाला दोघांनाही भारतीय संघाचा लोकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे. या बाबतीत आमचं उद्दिष्टं समान आहे. आम्ही या बाबतीत एकत्र आहोत, ’ असं गंभीरने बोलून दाखवलं होतं. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Virat Kohli : सचिनचा ‘हा’ विक्रम मोडण्यासाठी विराटला हव्या आणखी ५८ धावा)
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या निमित्ताने विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटींच्या मालिकेत तो खेळला नव्हता. त्यामुळे मायदेशातील बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धची ५ कसोटींची मालिका यावर आता त्याने लक्ष केंद्रीत केलं आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community